रक्षा बंधनाच्या दिवशीच घडल्या धक्कादायक घटना; एकाच दिवशी २ खून झाल्याने खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 12, 2022

रक्षा बंधनाच्या दिवशीच घडल्या धक्कादायक घटना; एकाच दिवशी २ खून झाल्याने खळबळ

https://ift.tt/QY4LNrO
उस्मानाबाद : आज रक्षा बंधन. एकीकडे शहरात उत्साहात रक्षा बंधन हा सण साजरा होत असतानाच उस्मानाबाद जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी २ झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पहिली धक्कादायक घटना आज सकाळी तुळजापूर शहराजवळील सिंदफळ येथे घडली. येथे किसन मनोहर सिध्दगणेश या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. तर उमरगा शहरात एका ३५ वर्षीय मजुराचा अतिशय क्रूरपणे खून केल्याची दुसरी धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. अजित वामन पाटील (वय अंदाजे ३५, रा . काळे प्लॉट) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप घटनांनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. (Two murders took place in Solapur on the day of ) या दोन घटनांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील काळे प्लॉटच्या शेजारी असलेल्या एका कॉलेजच्या परिसरातील अर्धवट बांधलेल्या इमारतीमध्ये अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली गेली . पोलिसांनी तत्काळ घटनास्थळा कडे धाव घेतली. या ठिकाणी एका तरुणाच्या चेहऱ्यावर अतिशय क्रूरपणे दगडाने मारहाण करून चेहरा विद्रूप केला होता. मयताची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर दगडाची एक मोठी छावणी होती. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, पोलिसांनी शेजारील काळे प्लॉट, व इतर भागात चौकशी केली असता मयत हा अजित वामन पाटील असून तो काळे प्लॉट येथे भाड्याने राहतो. त्याचे मूळ गाव हलसी हत्तरगा असून हल्ली कामानिमित् तोत उमरगा शहरात वास्तव्यास होता. प्रत्यक्षदर्शी नातेवाईकांनी हातावर गोंदलेल्या निशाणीवरुन मयताची ओळख पटवली आहे. क्लिक करा आणि वाचा- शहरासह जिल्ह्यात रक्षा बंधन सण साजरा होत असताना दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्याने शहरात शोककळा पसरली आहे. क्लिक करा आणि वाचा-