रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत असतानाच मैदान सोडले, नेमकं घडलं तरी काय पाहा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 3, 2022

रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत असतानाच मैदान सोडले, नेमकं घडलं तरी काय पाहा...

https://ift.tt/n7eYq0U
सेंट किट्स : रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत होता. रोहितने एक धडाकेबाज षटकार लगावला, तर एक चौकारही वसूल केला. पण त्यानंतर मात्र रोहितला मैदान सोडावे लागले. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहितने टॉस जिंकला आणि भारत प्रथम गोलंदाजी करणार असल्याचा निर्णय त्याने घेतला. वेस्ट इंडिजने यावेळी प्रथम फलंदाजी करत असताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा मैदानात उतरला होता. गेल्या सामन्यात रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. रोहितने यावेळी धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. रोहितने एक षटकार आणि एच चौकार लगावत ५ चेंडूंत ११ धावा केल्या. पण त्यानंतर मैदानात त्याला असह्य वाटू लागले. त्यावेळी भारताच्या डॉक्टरांनी मैदानात घाव घेतली. भारताच्या डॉक्टरांनी मैदानात रोहितची तपासणी केली. पण रोहितला यावेळी नीट उभे राहता येत नव्हते. कारण रोहितच्या कंबरेतील स्नायू दुखावल्याचे वाटत होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे रोहितला या वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळेच रोहित शर्माने यावेळी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. रोहितला नेमकं झालंय तरी काय, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. रोहितवर प्रथम तातडीचे उपचार केले जातील. त्यानंतरही रोहितला बरं वाटलं नाही तर त्याची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या चाचणीच्या अहवालानंतरच रोहित खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता रोहितबाबत कोणती अपडेट समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. रोहित जखमी निवृत्त झाल्यामुळे श्रेयस अय्यर हा फलंदाजीला आला. त्यानंतर श्रेयस आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा तिसरा ट्वेन्टी-२० सामना आहे. भारताने यापूर्वी पहिला तर वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना मालिकेत आघाडी घेता येणार आहे.