
औरंगाबाद : पोलिसांनी वाहनातील साहित्य चोरी करणाऱ्या एका चोराला अटक केली मात्र तो चोरी का करतो त्याचे कारण एकूण मुकुंदवाडी पोलीस देखील थक्क झाले. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैशे नसल्याने चालकाने चोरीचा मार्ग पत्करल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अरुण यशवंतराव कुंटे वय -४० (र.राजनगर, मुकुंदवाडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या चलकाचे नाव आहे. (husband eventually became a thief for ) रविवारी मुकुंदवाडीतून विष्णू छगनराय तवार (४९, रा. एन--१२) यांची दोन दिवसांपुर्वी चारचाकी वाहनातून बॅटऱ्या, व्हिल कॅप, एलईडी, जॅक चोरीला गेला होता. निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या सुचनेवरुन उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांनी तपास सुरू केला. तेव्हा एका खबऱ्याने रामनगर परिसरात चारचाकी वाहनांचे व्हिल जॅक विक्री करण्यासाठी एक इसम विकत घेणाऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांची नजर चुकवून चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पकडल्यानंतर तो अरुण यशंवतराव कुंटे (४०) असे त्याचे नाव असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या पत्नीला ब्रेन ट्युमरचा आजार जडला. आपल्या पत्नीवर योग्य तो उपचार करू शकेल इतके पैसे अरुणकडे नव्हते. आता काय करावे या विवंचनेत अरुण होता. त्याने विचार केला. आता काहीतरी केलेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पैसे कमावलेच पाहिजेत. कोणत्याही मार्गाने आता गेले पाहिजे, असे त्याने मनाशी ठरवले. त्यानंतर त्याने शक्कल लढवली. अरुण स्वत: चालक असल्याने गाड्यांचे पार्ट्स चोरुन ते विकून त्यावर दर महिन्याला लागणाऱ्या औषधांचा खर्च भागवता येईल असा त्याने विचार केला. तसे करणेही त्याने सुरू केले. सुरुवातीला त्यात यश मिळाले. त्यामुळे मग त्याने चालकाची नोकरी सोडून चोऱ्या सुरू केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.