Time Travel करुन ८८ वर्ष मागे आला, १४ ऑगस्टला मोठ्या आपत्तीचा दावा.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 14, 2022

Time Travel करुन ८८ वर्ष मागे आला, १४ ऑगस्टला मोठ्या आपत्तीचा दावा..

https://ift.tt/vWT32sP
नवी दिल्ली: अध्यात्मापासून ते विज्ञानापर्यंत टाइम ट्रॅव्हलबाबत चर्चा होत आली आहे. ज्याअंतर्गत अध्यात्मात शक्य मानलं गेलं आहे. तर विज्ञान असा दावा करत आहे की मानवी सभ्यता भविष्यात कदाचित टाइम ट्रॅव्हल करू शकेल. जरी विज्ञानाकडे अद्याप टाइम ट्रॅव्हल करण्याचे कोणतेही सूत्र नसले तरीही काही अशा थेरीज आहेत जे हे मानतात की टाइम ट्रॅव्हल शक्य होऊ शकतं. पण, सध्यातरी टाइम ट्रॅव्हल ही केवळ एक संकल्पना आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर अनेक लोक टाइम ट्रॅव्हल केल्याचा दावा करत आहेत. अशाच एका व्यक्तीने टाइम ट्रॅव्हल करून ८८ वर्ष मागे आल्याचा दावा केला आहे. टाइम ट्रॅव्हल करुन आलेल्या या व्यक्तीने १४ ऑगस्ट रोजी भयंकर आपत्तीचा इशारा दिला आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. हेही वाचा - २०९० मधून टाइम ट्रॅव्हल केल्याचा दावा या टाइम ट्रॅव्हलरने दावा केला आहे की तो २०९० मधून २०२२ मध्ये परत आला आहे. अकाउंटवरून त्याने हा दावा केला आहे. किम विंडेल नेक्स असे या व्यक्तीचे नाव आहे. या नावाने बनवलेल्या फेसबुक अकाउंटवरून त्याने हा दावा केला आहे. त्याची पोस्ट फेसबुकवर टाईम ट्रॅव्हल नावाच्या ग्रुपवर शेअर करण्यात आली आहे. ज्याचे सुमारे ३० हजार सदस्य आहेत. त्या व्यक्तीने असा दावा केला आहे की, त्याला निवडण्यात आलं आहे. त्याला लोकांना सावध करण्यासाठी इथे पाठवण्यात आले आहे. अमेरिकेला आजवरच्या सर्वात भीषण वादळाचा सामना करावा लागेल टाइम ट्रॅव्हलनंतर परत आलेल्या व्यक्तीने या आठवड्यात जगात सर्वनाश होणार असल्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अनेकजण मारले जातील, असा दावा त्या व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे. त्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, १४ ऑगस्टला अमेरिकेला आतापर्यंतच्या सर्वात भीषण वादळाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होईल. व्यक्तीच्या दाव्यानुसार, वादळामुळे सर्वाधिक नुकसान दक्षिण कॅरोलिनामध्ये होईल. हेही वाचा - दक्षिण कॅरोलिनामध्ये ६ चक्रीवादळं १४ ऑगस्ट रोजी दक्षिण कॅरोलिनाला ६ चक्रीवादळे धडकणार असल्याचा दावा या टाइम ट्रॅव्हलरने केला आहे. ज्याचा वेग ताशी २५० मैल असू शकतो. या वादळांमुळे मोठा विध्वंस होणार असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. व्यक्तीच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे. काही लोक या व्यक्तीच्या दाव्याला अफवा म्हणत आहेत, तर काही लोकांनी टाइम ट्रॅव्हल करणाऱ्या या व्यक्तीच्या दाव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हेही वाचा -