शिंदे गट अ‍ॅक्शन मोडवर; रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 14, 2022

शिंदे गट अ‍ॅक्शन मोडवर; रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

https://ift.tt/Ym2KohQ
रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात मुख्यमंत्री () एक्शन मोडमध्ये आला असून रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल पंडीत हे एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने हा उद्धव ठाकरे गटात असलेले आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आता शिवसेना संघटनेत काही नियुक्त्या करून लवकरच जाहीर सभाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या तयारीसाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गट एक्शन मोडवर आहे, अजूनही काही नियुक्त्या करण्यात येण्याची शक्यता आहे. ( has been appointed as the district chief of the shinde faction) उद्योग मंत्री म्हणून आपल्याला आपले मंत्री उदय सामंत हे आपल्याच जिल्हयातील मिळाले आहेत त्यामुळे युवकांसाठी पहिला हा रोजगार मिळवून देणारा उपक्रम राबवणार असल्याचे ही शिंदे गटाच्या सेनेचे नूतन जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले. दरम्यान राहुल पंडित हे शिवसेनेचे रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. तर आमदार राजन साळवी याचे खास मानले जायचे ते शिंदे गटात सामील झाल्याने आमदार राजन साळवी याना हा धक्का मानला जाते. माजी नगराध्यक्ष राहुल पंडित हे शिंदे गटाच्या सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्हयात उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दणका बसला असून दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटात आहेत. उदय सामंत यांना उद्योगमंत्री पद देऊन एकनाथ शिंदे गटाला जिल्हयात बळ देण्यात आले असून रामदास कदम एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत. दोन दिवसांनी आदित्य ठाकरे यांचा जिल्हा दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आलेली नियुक्ती महत्वाची ठरणार आहे.