मराठा आरक्षणासाठी कळंबमध्ये मोर्चा, मुस्लीम बांधवांकडून एकतेचं दर्शन, मोर्चेकऱ्यांवर पुष्पवृष्टी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 20, 2022

मराठा आरक्षणासाठी कळंबमध्ये मोर्चा, मुस्लीम बांधवांकडून एकतेचं दर्शन, मोर्चेकऱ्यांवर पुष्पवृष्टी

https://ift.tt/wno42ft
उस्मानाबाद : एक मराठा लाख मराठा या घोषणेने कळंब शहर आज दुमदुमले.सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळावे या मागणीसााठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांवर छत्रपती शिवाजी चौकात मुस्लीम समाजातील बांधवानी पुष्पवृष्ठी केली.जमियत उलेमा ए हिंदच्या मौलांना मंडळीनी पुढाकार घेवुन मराठा बांधवावर पुष्पवृष्ठी केली. हिंदू- मुस्लीम यांच्यातील अनोखा भाईचारा कळंब शहरात पाहायला मिळाला.तर, आझाद ग्रुपच्या वतीने पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.तर, जैन समाजाच्या वतीने चहापानाची सोय करण्यात आली होती. मोर्चामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर कळंब शहरातील मुस्लीम बांधवांनी पुष्पवृष्टी केली. तर, आझाद ग्रुपच्या वतीनं पाणी आणि अल्पोपहार देखील देण्याता आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सोबत असल्याचं दाखवत कळंबमध्ये हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवण्यात आलं. आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार , मोर्चेकरांचा निर्धार ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरांमध्ये मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरलं. या मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक व राजकीय नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांकडून मांडण्यात आली. सकल मराठा समाजातर्फे सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा जवळपास दोन तास चालला. या मोर्चात एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, अशा घोषणा देण्यात आल्या. कळंब शहरातील मोहेकर महाविद्यालयातील प्रांगणात भर पावसात मुलींनी भाषणे केली . मराठा समाजाल ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे. मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या कळंबमधील मोर्चात राजकीय नेत्यांना मोर्चांपासून दूर ठेवण्यात आलं होतं.