
बारामती : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून काहीही करून त्यांच्या हातून हा मतदारसंघ खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेते, आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या महिन्यात या मतदारसंघाच अनेक भाजप नेत्यांचे दौरे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी राम शिंदे सक्रिय झाले आहेत. आम्हाला वाटले अमेठीला जावे, तेथे आम्ही गेलो आणि जिंकलोही. आता बारामतीत जिंकायचे आहे. जर आम्ही अमेठी जिंकतो तर बारामतीही जिकू. तेव्हा सुप्रिया सुळे यांना आता दुसरा 'वायनाड' पाहावा लागेल, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. (bjp lader criticizes and ) राम शिंदे पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही सन २०१४ आणि २०१९ ची निवडणूक हरलो. आता आमचे लक्ष २०२४ च्या निवडणुकीवर आहे. २०२४ साठी आम्हाला उमेदवार ठरवायचा आहे. सन २०१४ ते २०२४ या काळात मोठा बदल झालेला आहे. मात्र जर का आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर मग बारामतीही आम्ही जिंकू. आम्हाला अमेठीत जावे लागले. आम्ही तेथे गेलो आणि जिंकलो. बारामतीत २०१४ ची निवडणूकहरलो, २०१९ ची निवडणूकही हरलो. मात्र आता २०२४ ची निवडणूक जिंकणारच. तेव्हा आता आता सुप्रिया सुळे यांना दुसरा वायनाड पहावा लागेल. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आमदार राम शिंदे यांच्यावर देण्यात आली असून येत्या २२, २३ आणि २४ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याची आखणी ते करत आहेत. तसेच ६ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही बारामती दौरा आहे. आमदार रोहित पवारांवर टीकास्त्र यावेळी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्यावरही निशाणा साधला. पानंद रस्त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला असून या संदर्भात मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणे पवार यांनी टाळले अससल्याचे शिंदे म्हणाले. कुठल्याही प्रकारची चौकशी होत असेल तर त्या चौकशीला सामोरे गेले पाहिजे आणि चौकशी समितीला सहकार्य केले पाहिजे. पण ते म्हणतात चौकशीत करायची गरज नाही. मी लय चांगलं काम केले आहे. त्यांना मी परवाच ओपन चॅलेंज केले आहे. मी राजीनामा द्यायला तयार आहे. तुम्ही राजीनामा द्या. दोघेजण मिळून एकदा जामखेडच्या जनतेच्या मनात काय आहे ते तपासून घेऊ. होऊ द्या एकदा लढत. नोटीस आली असेल तर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण त्यांचा अभ्यास चालू आहे बहुतेक. तीन प्रकरणांमध्ये त्यांना नोटीसा आलेल्या आहेत. सध्या ते अभ्यास करत आहेत. अभ्यास करून ते ईडीला उत्तर देतील. ईडीला सहकार्य करायची भूमिका त्यांनी संजय राऊत यांच्यासारखी घेतली आहे, असेही शिंदे पुढे म्हणाले.