जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं, 'दसरा मेळावा खऱ्या शिवसेनेचाच' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 4, 2022

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं, 'दसरा मेळावा खऱ्या शिवसेनेचाच'

https://ift.tt/5Il3msU
पुणे : येणाऱ्या दसऱ्याला शिवसेनेचा दसरा ( ) मेळावा होणार आहे. मात्र दसरा मेळावा शिवतीर्थावर कोण घेणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिंदे गट दसरा मेळावा शिवाजीपार्कवर (शिवतीर्थ ) घरण्यासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ( ) हे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहेत. मात्र दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनाच आहे, असे बोलून एका प्रकारे एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( ) यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनासाठी आज ते पुण्यात आले आहेत. यावेळेस मानाचा पहिला गणपती पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीच दर्शनासाठी आले असता ते बोलत होते. दसरा मेळावा विषय त्यांनी आपलं मत मांडलं. बाळासाहेबांची परंपरा उद्धव ठाकरे पुढे नहेतील, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कोण घेणार याकडे अवघ्या राज्यच लक्ष लागून राहील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना एक गट फोडून ती खरी शिवसेना आहे असा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा होऊ नये म्हणून महाविकास आघाडीशी युती तोडून त्यांनी भाजप सोबत नवीन सरकार राज्यात स्थपन केलं आहे.या प्रसंगी नंतर धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना भवनवर शिंदे गट आपला दवाव करत आहे मात्र शिवसेनाचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो दसरा मेळावा या मध्ये एकनाथ शिंदे हे अग्रेसर आहेत. मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यास ठाम आहे. शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे एक शिवसेनेचं समीकरण आहे. असा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला दिवचण्याचा प्रयत्न केला आहे, असं पाटील म्हणाले. दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनेचाच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला. ठाकरे ज्या बाजूला असतात तोच खरा दसरा मेळावा. येणाऱ्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होईल. पण दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला आहे. शिवतीर्थ आणि दसरा मेळावा ही परंपरा उद्धव ठाकरे हे पुढे नेतील अशी मला खात्री आहे, असं जयंत पाटील म्हणाले.