मिस्त्रींच्या कारला अपघात झाला त्या रस्त्यावर...; तज्ज्ञांच्या टीमनं दिली चिंताजनक माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 27, 2022

मिस्त्रींच्या कारला अपघात झाला त्या रस्त्यावर...; तज्ज्ञांच्या टीमनं दिली चिंताजनक माहिती

https://ift.tt/14Q07iX
मुंबई: उद्योगपती सायरस मिस्त्रींचं तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात निधन झालं. ४ सप्टेंबरला मिस्त्रींच्या कारला अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. पालघरमधील चारोटी येथील सूर्या नदीजवळ मिस्त्रींच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. तज्ज्ञांच्या स्वतंत्र टीमनं या भागातील रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला. महाराष्ट्रात आणि गुजरातला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील जवळपास ७० किलोमीटर रस्त्याची पाहणी करून तज्ज्ञांनी अहवाल तयार केला आहे. या अहवालातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. तज्ज्ञांच्या पथकानं रस्त्याच्या देखभालीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चालकाला सूचना देण्यासाठी रस्त्यावर पुरेशी व्यवस्था नाही. चालकांना माहिती देणारे बोर्ड अतिशय कमी आहेत. दोन डझनपेक्षा अधिक ठिकाणी दुभाजक नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्याला मार्किंग्स नाहीत, अशी माहिती तज्ज्ञांच्या अहवालात आहे. त्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या (आयआरएफ) भारतातील विभागानं तयार केलेल्या पथकानं एनएच-४८ वरील ७० किलोमीटर भागाची पाहणी केली. या रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याकडून काही उपाय सुचवण्यात आले आहेत. पुलांच्या, डायव्हर्जनच्या आधी वेगमर्यादेचे फलक लावण्यात यावेत, कॅरिजवे अरुंद होत असलेल्या तशा सूचनांचे फलक लावले जावेत, देखभाल-दुरुस्तीचं काम करण्यात यावं, दुभाजक नसलेल्या भागांत ते तयार करण्यात यावे, रस्त्यांवर योग्य मार्किंग्स करण्यात यावी, असे उपाय सांगण्यात आले आहेत. मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आठवड्याभरात रस्त्याचं ऑडिट करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं () मंजुरी दिल्यानंतर रस्त्याचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आयआरएफनं दिली. आयआरएफनं आपला अहवाल एनएचएआयला दिला आहे. आयआरएफनं कारचं ऑडिट केलेलं नाही. त्यांनी केवळ रस्ते सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला आहे. राज्य सरकारकडून अपघाताचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास सुरू आहे.