शिंदे गट आणि सौजन्य-कायद्याचा संबंधच कुठे, सरन्यायाधीश सत्कार सोहळ्यावरुन शिवसेनेचे बाण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 14, 2022

शिंदे गट आणि सौजन्य-कायद्याचा संबंधच कुठे, सरन्यायाधीश सत्कार सोहळ्यावरुन शिवसेनेचे बाण

https://ift.tt/UePDx84
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा खटला सरन्यायाधीशांनी नेमलेल्या घटनापीठासमोर सुरु असताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) यांनी सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांच्या सत्काराच्या व्यासपीठावर न जाण्याचे संकेत पाळायला हवे होते, मात्र शिंदे आणि त्यांच्या गटाचा संकेत-सौजन्य-कायदा या शब्दांशी संबंधच नाही, असं म्हणत 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदेंना कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा उच्च न्यायालयाच्या वतीने मुंबईत शनिवारी सत्कार आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे सुपुत्र असणाऱ्या सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कार समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे संकेतांना धरून नाही, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. 'सामना'च्या अग्रलेखात काय? सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याबाबतचा एक बाद त्यांच्या मुंबईतील सत्कार समारंभानंतर निर्माण झाला. तो दुर्दैवी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे व्यासपीठावर होते, हे संकेतांना धरून नसल्याची टीका झाली. कारण राज्यातील सत्तासंघर्षाचा खटला सरन्यायाधीशांनी नेमलेल्या घटनापीठासमोर सुरू आहे व स्वतः मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेसंदर्भातील निर्णय याच घटनापीठास घ्यायचा आहे. अशावेळी व्यासपीठावर न जाण्याचे संकेत व सौजन्य मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळायला हवे होते; अशी नाराजी 'सामना'च्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. हेही वाचा : एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचा संकेत, सौजन्य, कायदा वगैरे शब्दांशी संबंध नसल्याने आपले सरन्यायाधीश उगाच वादात सापडले. अर्थात शिंदे यांनी व्यासपीठावर काही केले तरी 'रामशास्त्र' हे न्यायानेच वागतात व शेवटी सत्याचाच विजय होईल, हे नक्की आहे, अशी खात्री 'सामना'च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. हेही वाचा :