
पनवेल : नवी मुंबईतील तळोजा MIDC मधील मोदी फेम फार्मा या केमिकल कंपनीला मोठी आग लागली आहे. अग्निशमन विभागाच्या ३ ते ४ गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून अग्निशमन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तळोजा MIDC केमिकल झोन मधील प्लॉट क्र. १०३ या ठिकाणी ही आग लागली आहे. (A massive fire has broken out at Modi Fame Pharma Company in Taloja MIDC) मोदी फेम फार्मा या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे आग वाढत आहे. त्यामुळे आग आजूबाजूच्या कपन्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. अशी शक्यता असली तरी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतांना पाहायला मिळते. क्लिक करा आणि वाचा- काही कामगार अडकले आग लागलेल्या कंपनीत काही कामगार देखील अडकले असल्याचे कळते आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. या कंपनीत ब्रोमीन वायू हाताळला जात होता. येथे ब्रोमीन वायूची गळती झाल्यानंतर कंपनीपासून सुमारे १०० मीटरपर्यंतचा परिसर निर्जन करण्यात आला होता. वायूची बाधा होऊ नये यासाठी या परिसरात कोणालाही येऊ दिले जात नव्हते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-