मुंबई लोकल: उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नाही, मात्र पश्चिम मार्गावरील वाहतूक खोळंबणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 3, 2022

मुंबई लोकल: उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नाही, मात्र पश्चिम मार्गावरील वाहतूक खोळंबणार

https://ift.tt/vjPxnfU
‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन रविवारी होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील रविवारी होणारा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वे स्थानक - सांताक्रूझ ते गोरेगाव वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ मार्ग - अप आणि डाऊन धीमा परिणाम - ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. विलेपार्ले स्थानकात लोकलला दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. राम मंदिर स्थानकात फलाट नसल्याने जलद मार्गावरील लोकल थांबणार नाहीत.