
पुणे : 'लम्पी स्किन' या जनावरांच्या आजाराबाबत पुणे जिल्हा परिषेदने धोरण ठरविले असून, पशुवैद्यकीय विभागाचे ३१ फिरते दवाखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत. फिरत्या दवाखान्यांच्या मदतीने चार तासांच्या आत नमुना संकलन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जनावरांमध्ये 'लम्पी स्किन' हा त्वचेचा आजार असून, त्याच्या लक्षणांविषयी दुग्धशाळा, दूध उत्पादक संघ, ग्रामपंचायती आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांद्वारे जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. लागण झालेली संशयित जनावरे ओळखण्यासाठी खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकांच्या बाह्यरुग्ण विभागात निरीक्षण केले जाणार आहे. जनावरांची जीवित हानी टाळण्यासाठी प्रभावी उपचार केले जात आहेत. प्रादुर्भाव असलेल्या गावांमध्ये शिबिरे उभारण्यासाठी महाविद्यालयांशी समन्वय साधणे, २४ तास देखरेखीसाठी अतिरिक्त सरकारी डॉक्टर आणि पशुधन पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दहा दिवसांत दहा लाखांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे 'लम्पी स्किन'चा उद्रेक रोखता आला. यावेळीही लसीकरणावर भर दिला जात आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. लम्पी स्क्रिन ग्रस्त जनावरांची संख्या २९ वर जुन्नर तालुक्यात सर्वप्रथम 'लम्पी स्किन'ग्रस्त जनावर आढळून आले. त्यानंतर परिसरातील जनावरांचे नमुणे तपासण्यात आले. आतापर्यंत २९ जनावरांना 'लम्पी स्किन'ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जुन्नरमधील मांडवे आणि कोपरे गावातील १८, आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील नऊ आणि मावळ तालुक्यातील उर्से गावातील दोन अशा २९ जनावरांना आतापर्यंत 'लम्पी स्किन'ची लागण झाली आहे. लम्पी स्किन आजार राजस्थान, पंजाब, गुजराज, हरियाणा, हिमाचल प्रदेशात आढळून आला होता. आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये देखील हा आजार आढळून आला आहे. पशुसंवर्धन विभागानं पशुपालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. पुण्यासह जळगाव, अहमदनगर, धुळे, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात देखील प्रादुर्भाव आढळला आहे. पुण्यात २९ तर अहमदनगरमध्ये ६७ जनावरांना या आचाराजा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात ८५० जनावरांना या आजारानं ग्रासलं होतं, त्यापैकी ५०० हून अधिक जनावरं बरी झाली आहेत. काय काळजी घ्यावी जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण गोठ्यांची स्व्छता गायी म्हशी स्वतंत्र बांधाव्यात डॉक्टरांशी संपर्क बाधित जनावरांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था