India vs Pakistan test series: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका इंग्लंडमध्ये?; BCCI ने हे उत्तर दिले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 28, 2022

India vs Pakistan test series: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका इंग्लंडमध्ये?; BCCI ने हे उत्तर दिले

https://ift.tt/zQEZVjL
लंडन : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने () भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका आयोजित करण्याची औपचारिक ऑफर दिली आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्डाने मात्र (BCCI) नजीकच्या भविष्यात अशी कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे. ब्रिटीश दैनिक 'टेलिग्राफ' ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी सध्याच्या टी-२० मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) चर्चा केली . त्यावेळी त्यांनी भविष्यात इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची मालिका आयोजित करण्याची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. ( not interested in england offer to host ) ईसीबीने स्वतःच्या फायद्यासाठी ही ऑफर दिली असताना बीसीसीआयने पुढील काही वर्षांत अशी कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले, 'पहिली गोष्ट म्हणजे ईसीबीने भारत-पाक मालिकेबाबत पीसीबीशी चर्चा केली आहे. हे थोडे विचित्र वाटते. कोणत्याही परिस्थितीत, पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेचा निर्णय नाही तर सरकार घेईल. आम्ही बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच पाकिस्तानविरुद्ध खेळू.' भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संघांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये भारतात खेळली गेली होती. ही मर्यादित षटकांची मालिका होती. तसेच दोन्ही देशांमधील शेवटची कसोटी मालिका सन २००७ मध्ये खेळली गेली होती. ईसीबीच्या या ऑफरचे कारणही पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, 'यूकेमधील या सामन्यांसाठी दर्शक मोठ्या संख्येने येतील, याचे कारण म्हणजे दक्षिण आशियाई देशांची लोकसंख्या तेथे मोठी आहे. याशिवाय या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रायोजकत्व देखील मिळणार आहे आणि हे सामने टेलिव्हिजनवरही भरपूर प्रेक्षक पाहतील.' पीसीबी देखील एखाद्या तटस्थ ठिकाणी भारताविरुद्ध खेळण्यास इच्छुक नाही असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. परंतु पीसीबीने ईसीबीबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. या वरूंन दोन्ही देशांच्या बोर्डांमधील वाढती जवळीक देखील दर्शवते.