हवेत झुला तुटला, ५० फुटांवरुन थेट जमिनीवर आदळला, अनेक जखमी, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 5, 2022

हवेत झुला तुटला, ५० फुटांवरुन थेट जमिनीवर आदळला, अनेक जखमी, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

https://ift.tt/ephzq7H
मोहाली: येथे रविवारी एक अत्यंत भयंकर दुर्घटना घडली. येथील दसरा मैदानावरील जत्रेत एक झुला हवेत तुटला आणि तब्बल ५० फुटांवरुन खाली कोसळला. या झुल्यावर जवळपास ५० जण बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणाचा जीव गेलेला नाही मात्र १० जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. मोहालीच्या सेक्टर ६५ मध्ये एका जत्रेचं आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. येथे एका झुल्यावर जवळपास ५० लोक बसले होते. पण, अचानक ५० फुटांच्या उंचीवर असताना हा झुला तुटला आणि कुणीही काही करण्याच्या आत तो थेट जमिनीवर येऊन कोसळला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की बघणारा प्रत्येक जण हादरुन गेला. पाहा घटनेचा थरारक व्हिडिओ हेही वाचा - ही घटना घटताच परिसरात एकच खळबळ उडाली. आरडोओरड ऐकून लोक जमले, त्यानंतर लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत १० महिला आणि लहान मुलं जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाचा संपूर्ण तपास करुन दोषींवर कारवाई केली जाईल. हेही वाचा - प्रत्यक्षदर्शीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'येथे रुग्णवाहिका, पीसीआर सुविधा नव्हती. त्यांचे (फेअरचे) बाऊन्सर दारु पिऊन घटनेच्या तब्बल २० मिनिटांनंतर आले. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. कोणत्याही सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थेशिवाय ही जत्रा कशी सुरु होती?, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. सुभाष म्हणाले की, 'आम्हाला रात्री ९-९.१५ वाजता कळाले की जत्रेत झुला पडला आहे. आतापर्यंत ५ जण आमच्याकडे आले आहेत. आलेल्या लोकांपैकी कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कुणाच्याही डोक्याला दुखापत झालेली नाही'. हेही वाचा -