अमित मिश्राच्या एका वाक्याने पाकिस्तानला मिर्ची झोंबली, म्हणाला 'आमच्या शेजाऱ्यांसाठी हा...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 29, 2022

अमित मिश्राच्या एका वाक्याने पाकिस्तानला मिर्ची झोंबली, म्हणाला 'आमच्या शेजाऱ्यांसाठी हा...'

https://ift.tt/Wgzjp78
सिडनी : पाकिस्तानच्या चाहत्यांना झिम्बाब्वेविरुद्धचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. त्यामध्ये आग ओतण्याचे काम भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राच्या ट्विटने केले आहे. या ट्विटमधील एक वाक्य पाकिस्तानच्या चाहत्यांना चांगलेच झोंबल्याचे पाहायला मिळाले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर अमित मिश्राने हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, " पाकिस्तानचा पराभव हा काही धक्का नव्हता, तर हा सामना झिम्बाब्वेच जिंकणार होती. आमच्या शेजाऱ्यांसाठी हा वाईट दिवस होता." हा सामना झिम्बाब्वेच जिंकणार होती, या ट्विटमधील वाक्याने चांगलेच रान पेटले आहे. पाकिस्तानचे चाहते आता मिश्राला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. वसिम अक्रमनेही केली टीका....वसिम यावेळी रागाच्या भरात म्हणाला की, " मी जर यावेळी पाकिस्तानचा कर्णधार असलो असतो तर काही गोष्टी या वेगळ्या दिसल्या असत्या. कारण माझे पहिले ध्येय हे पाकिस्तानला विश्वचषक जिंकवून देणे, हेत असले असते आणि त्यासाठी मला जर गाढवालाही बाप बनवावे लागले असते तरी मी बनवले असते. पाकिस्तानच्या संघाच्या काही गोष्टी चुकल्या. माझ्यासमोर शोएब मलिकसारखा अनुभवी खेळाडू आहे. मी त्याला संघात घेतले असते. पण निवड समितीने त्याला संधी दिली नाही." फेक मिस्टर बीनची सोशल मीडियावर खळबळ....पाकिस्तानच्या संघाला सर्वांनीच ट्रोल करायला सुरुवात केली. पण त्यानंतर मात्र सोशल मीडियावर खलबळ माजवली ती मिस्टर बीनने. पण हा मिस्टर बीन पाकिस्तानमधील होता. पण सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या या मिस्टर बीनचा आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. ज्याच्याबद्दल इतका गदारोळ आहे पाकिस्तानी मिस्टर बीन कोण आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आसिफ मुहम्मद असे त्याचे नाव आहे. तो मिस्टर बीनची भूमिका करणारा ब्रिटीश अभिनेता रोवन ऍटकिन्सनसारखा दिसतो. आसिफ कॉमेडियन असून अभिनयही करतो. अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही तो दिसला आहे. शाहिद आफ्रीदीबरोबरही त्याने एक जाहीरात केली आहे.