रत्नागिरीः रविवारी रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे कोठारवाडी येथे नव्याने लग्न झालेल्या जोडप्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ३० ऑक्टोबर रोजी रविवारी पहाटे ५.३०च्या सुमारास नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. () आवघ्या सहा महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या जोडप्याने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे. या आत्महत्या प्रकरणाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तर नवदाम्पत्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचाः संदीप जयवंत गोताड (२७) व त्याची पत्नी पूजा संदीप गोताड अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांनी घरच्या वाश्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाचाः खंडाळा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी संदीप व त्याची पत्नी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. सुमारे सहा महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत. वाचाः