उद्यापासून हॅलो नाही, तर वंदे मातरम, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अध्यादेश निघाला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 2, 2022

उद्यापासून हॅलो नाही, तर वंदे मातरम, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अध्यादेश निघाला

https://ift.tt/EfAHsgn
मुंबई: राज्य सरकारच्या सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लँडलाइन आणि मोबाइल फोनवर 'हॅलो' ऐवजी आता '' म्हणावे लागणार आहे. तसा अध्यादेशच (GR) आज जारी करण्यात आला आहे. महात्मा गांधी जयंती आणि अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबरपासून अभिवादनातील बदलाची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलो ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला. (govt employees to greet people with ) रविवारी वर्धा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. हे परिपत्रक शासकीय, निमशासकीय, स्थानिक नागरी संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापनांना लागू असणार आहे. 'हॅलो' हा अर्थहीन शब्द आहे असे परिपत्रकात म्हटले आहे. त्याऐवजी फोनवरील संभाषण आणि वैयक्तिक संभाषण वंदे मातरमने सुरू केले तर ते अनुकूल वातावरण तयार करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा देण्यास मदत करेल, असेही म्हटले आहे. सास्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्राच्या वनविभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी कामाशी संबंधित फोन आल्यावर वंदे मातरम म्हणत प्रतिसाद देण्याचे आदेश दिले होते. वनविभागाने एक जीआर जारी केला होता. त्यानुसार सर्वसामान्य नागरिक आणि सरकारी कामाशी संबंधित लोकप्रतिनिधींचे फोन अटेंड करताना वनविभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हॅलोऐवजी वंदे मातरम बोलण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचवेळी, आता राज्य सरकारने सर्व सरकारी अधिकाऱ्यांना नमस्कार ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचा जीआर जारी केला आहे. स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिकमंत्र्यांनी केली होती घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वीच या संबंधात भाष्य केले होते.आम्ही स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी नमस्तेऐवजी फोनवर वंदे मातरम असे म्हणावे असे मला वाटते, असे मुनगंटीवार म्हणाले होते. याबाबतचा औपचारिक शासन आदेश लवकरच जारी केला जाईल, असेही ते म्हणाले होते. पुढच्या वर्षी २६ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी फोनवर वंदे मातरम् म्हणावे असे मला वाटते, असेही ते म्हणाले होते. या निर्णयाला झाला होता विरोध सांस्कृतिक मंत्र्यांच्या या आदेशानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी आक्षेपही घेतला होता. या निर्णयावर आक्षेप घेत मुंबईच्या रझा अकादमीकडून आम्ही फक्त अल्लाहची पूजा करतो, त्यामुळे वंदे मातरम्ऐवजी दुसरा पर्याय द्यावा, असे म्हटले होते.