तिसऱ्या सामन्यासाठी भारतापुढे एकच मोठी चिंता, रोहित शर्माचे टेंशन वाढले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 4, 2022

तिसऱ्या सामन्यासाठी भारतापुढे एकच मोठी चिंता, रोहित शर्माचे टेंशन वाढले

https://ift.tt/3EypSkl
इंदूर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी टी-२० म्हणजे षटकार, चौकारांचा धो-धो पाऊसच ठरली. भारताने मालिकेत २-० आघाडीही मिळवली आहे; पण तरीही संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, खुद्द कर्णधार रोहित शर्माने ही असाच सूर लावला आहे. आता किमान मालिका जिंकल्याने दडपण कमी झाले असेल. यामुळे मंगळवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या लढतीत तरी गोलंदाज कामगिरी उंचावतात का, याकडे लक्ष लागले आहे. खेळपट्टीचा अंदाज : होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडूला सातत्याने उसळी मिळत असते. फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळून आपल्या भात्यातील फटक्यांनी सर्वोत्तम फलंदाजी करणे आवश्यक. स्टेडियमची सीमारेषा जवळ असल्याने गोलंदाजांची चिंता वाढते. रोहित शर्माच्या ११८ धावांच्या खेळीमुळे भारताने येथेच २६० धावांचा डोंगर उभारला होता. हवामानाचा अंदाज : तापमान कमीतकमी २१ अंश असण्याची शक्यता. मात्र, आर्द्रताही सर्वाधिक असेल. पावसाची अजिबात शक्यता नाही. भारतीय संघ: (India Cricket Team) रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज. दक्षिण आफ्रिका संघ: (South Africa Team) टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रॉसो, तबरेझ शम्सी आजचा सामनातिसरी टी-२० : भारत वि. द. आफ्रिका स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर वेळ : संध्याकाळी ७ पासून प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आमनेसामनेएकूण टी-२० : २० भारताचे विजय : ११ द. आफ्रिकेचे विजय : ८ अनिकाली : १ विराट, राहुल संघाबाहेर...गोलंदाज डावाच्या अखेरच्या षटकांत (डेथ ओव्हर्स) सातत्याने अपयशी ठरत आहेत. ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्ड कप तोंडावर आला असताना असे होणे हे चांगले लक्षण नाही. रोहितचे फलंदाज भरात आहेत. त्यादृष्टीने आजच्या लढतीतून माजी कर्णधार आणि महत्त्वाचा फलंदाज विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने पत्रक काढून तशी माहिती दिली. ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ मुंबईतून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या लढतीनंतर विराट आणि राहुल थेट मुंबईत संघात सहभागी होतील. अशा परिस्थितीत फलंदाज श्रेयस अय्यरला विराटऐवजी संघात संधी मिळू शकते.