पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दोघा जणांनी त्यांच्याच एका मित्राचे सोन्याच्या लालसेतून अपहरण केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरुन सारोळा पुलावरुन नीरा नदीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निलेश दत्तात्रय वरघडे, (वय ४३ वर्ष), रा. चाळ नं.बी/८२ खोली नं.२४, सुप्पर इंदिरा नगर) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी दीपक जयकुमार नरळे (वय २९ वर्ष), आणि रणजीत ज्ञानदेव जगदाळे, (वय २९ वर्षे) या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र निलेश वरघडे याचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ ऑक्टोबर रोजी निलेश वरघडे हा घरी परत न आल्याने रूपाली रुपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल केली. बिबवेवाडी चौकशी सुरू केली असता दीपक जयकुमार नरळे (रा.नऱ्हे आंबेगाव) व त्याचा साथीदार रणजित ज्ञानदेव जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे. निलेश वरघडे हा वास्तूशास्त्र सल्लागार म्हणून काम करीत होता. आरोपी आणि निलेश हे मित्र होते. निलेशच्या अंगावर असलेले सोने चोरी करण्याचे आरोपींनी ठरवले आणि त्याचा प्लॅन देखील बनवला. एका मेडिकल दुकानाची पूजा आहे सांगत आरोपींनी निलेश याला नऱ्हे येथे नेले. हेही वाचा : कॉफीमधून निलेशला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. खून केल्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह निरा नदीत फेकून देण्यात आला. हेही वाचा :