विदर्भाच्या कापूस पंढरीत लिलावाला दणक्यात सुरुवात, बळीराजाच्या पांढऱ्या सोन्याला उच्चांकी दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 2, 2022

विदर्भाच्या कापूस पंढरीत लिलावाला दणक्यात सुरुवात, बळीराजाच्या पांढऱ्या सोन्याला उच्चांकी दर

https://ift.tt/Zl7GCmT
अकोला : विदर्भातील कापसाची पंढरी अशी ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातील कपाशी खरेदीला सुरवात झालीय. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी कापूस खरेदीचा काल ३१ ऑक्टोबरला शुभारंभ झालाय. काल आणि आज मंगळवारी अकोट बाजारपेठेत कापसाला ९ हजार १११ इतका भाव मिळाला. कापसाला चांगला भाव मिळाल्याने खऱ्या अर्थाने हा शुभमुहूर्त ठरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजार समितीत प्रथम कापूस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मुहूर्तावर कापूस आणणारे शेतकरी मनिष मोहन तायडे (रा. पोपटखेड, ता. अकोट, जि. अकोला) यांचा बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन गोपाळराव पुंडकर व तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी मुरलिधर हरिचंद्र चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ७,६०० पासून ९,१११ पर्यंत भाव मुहूर्तावर नंदिकेश्वर जिनिंगकडून सुनिल काळे यांनी लिलावात बोली लावुन मुर्हताच्या कापसाला ९ हजार १११ रुपये इतका भाव देण्यात आला. तसेच अभय प्रमोद तळोकार रा. आकोट, अरुण देवमन सपकाळ रा. खैरखेड, उषा प्ररमानंद लोखंडे रा. आकोलखेड प्रमोद रामचंद्र खंडारे या कास्तकांरानीही कापूस शेतमाल विक्री करीता आणला, यांचा बाजार समितीचे प्रशासक, निखील विजय गावंडे, रितेश महाविरप्रसाद अग्रवाल, विशाल प्रभाकर बोरे, कुलदिप भिमराव वसु, बाजार समितीचे सचिव सुधाकर किसन दाळू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी यांच्या कापसाला लिलावात ७ हजार ६०० पासून ९ हजार १११ रूपये पर्यंत भाव मिळाला. बाजार समितीचे माजी संचालक अतुल म्हैसने, कापूस व्यापारी, पवन गुप्ता, प्रवीण चांडक, दिपक अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, राजू केला, किशोर लखोटीया, मुरलीधर चौधरी, तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. असा आहे कापसाचा सरकारी दर कापूस खरेदीचा सरकारी दर ६ हजार ३०० रूपये असा आहे. परंतू, अकोल्यातील अकोटमध्ये काल कापसाला ७ हजार ६०० पासून ९ हजार १११ रूपये इतका भाव मिळाला. दरम्यान, आज मंगळवारी अकोट बाजार समितीमध्ये कापसाला ८ हजार ५०० रुपये इतका भाव होता. आतापर्यंत अकोट बाजार समितीमध्ये १ हजार ५०० क्विंटल म्हणून अधिक कापूस खरेदी झाला आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील फक्त एकट्या अकोट बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन गोपाळराव पुंडकर यांनी 'मटा ऑनलाइन'शी बोलताना दिली.