दीड हजार फूट उंच धबधब्यावरुन पाय घसरला, खडकावर आपटून नाशकात विद्यार्थ्याचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 24, 2022

दीड हजार फूट उंच धबधब्यावरुन पाय घसरला, खडकावर आपटून नाशकात विद्यार्थ्याचा मृत्यू

https://ift.tt/NDx1plZ
नाशिक : साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यात असलेल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथील गरम पाण्याच्या झऱ्यांजवळ हा अपघात घडला. सुरत येथून सहलीसाठी आलेल्या झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुमारे दीड हजार फूटांवरुन पाय घसरुन पडून खडकावर आपटल्याने पर्यटक विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. हा विद्यार्थी गुजरात राज्यातून आपल्या महाविद्यालयातील दहा ते बारा मित्रांसमवेत आला होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती ( वय १८ वर्ष) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मित्रांसोबत गुजरातहून सहलीला

तक्षिल हा सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे तो सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास हे सर्व जण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईंट धबधब्यावर आंघोळ करीत होते. यावेळी खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरुन पंधराशे फूट खाली पडून खडकावर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच पोलीस व वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर पाच वाजताच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा : या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात सुट्टीच्या दिवशी प्रामुख्याने गुजरात राज्यातील आणि नाशिकसह राज्यभरातील पर्यटक येत असल्याने गर्दी होत असते आणि तरुण मंडळी देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने काही जणांकडून या ठिकाणी गोंगाट- गोंधळ होत असल्याने याचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो आणि अनेक लहान मोठ्या घटना देखील असतात त्यामुळे पोलिसांनी तसेच वन विभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. हेही वाचा :