या विश्वचषकातील सर्वात मोठा विजय, स्पेनने कोस्टा रिकाला धक्का देत केला गोल धमाका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 24, 2022

या विश्वचषकातील सर्वात मोठा विजय, स्पेनने कोस्टा रिकाला धक्का देत केला गोल धमाका

https://ift.tt/ubf1ZzE
दोहा : या विश्वचषकातील आतापर्यंच्या सामन्यांमध्ये सर्वात मोठा विजय मिळवण्याचा मान यावेळी स्पेनला मिळाला. स्पेनने कोस्टा रिकाबरोबरच्या सलामीच्याच सामन्यात गोल धमाका केला आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. स्पेनचा संघ या सामन्यात चॅम्पियनसारखा खेळला. कारण सामन्याच्या ११व्या मिनिटाला डॅनी ओल्मोने स्पेनसाठी पहिला गोल केला आणि संघाचे खाते उघडले. त्यानंतर १० मिनिटांनी स्पेनसाठी दुसरा गोल पाहायला मिळाला. यावेळी स्पनेच्या मार्को असेन्सियाने संघासाठी २१ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर स्पेनच्या फेरान टोरेसने दोल गोल लगावले. टोरेसने यावेळी पहिला गोल पेनेल्टी शूट आऊटवर ३१व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे टोरेसच्या या गोलच्या जोरावर स्पेनने पहिल्या सत्रात ३-० अशी दमदार आघाडी घेतली होती. स्पेनने दुसऱ्या सत्रात गोल धडाकाच लावला. स्पेनने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये जास्त आक्रमण केले नाही. पण सामन्याच्या ५४व्या मिनिटाला टोरेसने वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल केला. स्पेन या गोल चौकारावर थांबेल, असे वाटत होते. पण त्यानंतर स्पेनने अजून तीन गोल केले. स्पेनच्या गॅव्हीने सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला गोल केला आणि स्पेनचे गोल पंचक पूर्ण झाले. कार्लोस सोलेरने यावेळी सामन्याच्या ९० व्या मिनिटाला गोल केला आणि स्पेनसाठी हा सहावा गोल ठरला. स्पेनच्या अलव्हारो मोराटाने यावेळी सामन्याच्या ९२ व्या मिनिटाला गोल केला आणि संघाचा हा सातवा गोल ठरला. मोरोक्को आणि क्रोएशिया सामना बरोबरीत...गतउपविजेत्या क्रोएशियाला वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत गोलशून्य बरोबरीस सामोरे जावे लागले. गतस्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू लुका मॉड्रिकची बुधवारी झालेल्या सामन्यात कोंडी करून मोरोक्कोने एका गुणाची कमाई केली. मोरोक्कोने क्रोएशियाचा चांगलाच कस पाहिला. त्यांनी भक्कम बचाव करतानाच प्रभावी प्रतिआक्रमणेही केली. सौदी अरेबियाच्या विजयामुळे तुलनेत कमकुवत संघांचा आत्मविश्वास उंचावला असल्याचे दिसत आहे. सौदीने अर्जेंटिनास पराभूत केल्यानंतर ट्युनिशियाने डेन्मार्कला रोखले, तर मोरोक्कोनेही हीच कामगिरी केली. मोरोक्कोने मॉड्रिकला आक्रमणापासून रोखून अर्धी लढत जिंकली. त्याला गोलसाठी एकच प्रयत्न करता आला. मात्र, त्याची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाल्याने मोरोक्कोच्या चाहत्यांनी हुर्यो उडवली. उत्तरार्धात ‘पीएसजी’कडून खेळणारा मोरोक्कोचा आक्रमक आश्रफ हकिमी याची अचूक, ताकदवान किक क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविक याने रोखली आणि क्रोएशियाच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.