पुणे : पुण्यातील नवले पुलावर (Navle Bridge) गेल्या दोन दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. दिवसेंदिवस हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ट्रकने ४८ गाडयांना धडक दिली. त्यानंतर त्याच रात्री देखील पुन्हा दोन झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी या साठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नऱ्हे सेल्फी पॉइंट येथे "सावधान, पुढे नवले पूल आहे" अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहे. या फ्लेक्सवर तीव्र स्वरूपाचा उतार आणि त्याबरोबरीने कावळ्याचा देखील फोटो दाखवण्यात आला आहे. यावर 'सावधान... पुढे नवले ब्रीज आहे' अशी रचना केली असून जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंट पर्यंत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगू लागली. क्लिक करा आणि वाचा- कात्रज बोगद्यापासून थेट नवले पुलापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार असून अनेकदा मोठी वाहने चालक गाडी बंद करून अथवा न्युट्रल करून चालवतात. त्यामुळे अनेकदा वाहनाचे ब्रेक लागत नाहीत आणि त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते. त्याचेच उदाहरण आपण सर्वांनी रविवारी संध्याकाळी पाहिले. या दुर्घटनेत एका वाहनाने ४८ वाहनांना धडक दिली. त्यामुळे या मार्गावर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भूपेंद्र मोरे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबाबत भूपेंद्र मोरे यांनी सांगितले की, नवले ब्रीज हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून रस्ते प्राधिकरण मात्र याबाबत उपययोजना अद्यापही करत नाहीये. असे मोठे अपघात झाल्यावर प्रशासनाला तेवढ्यापुरती जाग येते. त्यामुळे ढिम्म असलेल्या प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी अशा प्रकारचे बॅनर लावले असून निदान हे बॅनर लावल्याने तरी प्रशासनाला जाग येईल, असे मोरे यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/iEYQsVy