'हॅलो... श्रीमंत महिलांसोबत सेक्स करा, तुम्हाला पैसे मिळतील'; पुण्यात महिलेला आलेल्या कॉलने खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 18, 2022

'हॅलो... श्रीमंत महिलांसोबत सेक्स करा, तुम्हाला पैसे मिळतील'; पुण्यात महिलेला आलेल्या कॉलने खळबळ

https://ift.tt/M3HAk4K
पुणे : उच्चभ्रू वस्तीतील श्रीमंत महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैशाची ऑफर देणारा फोन कॉल शहरातील एका महिलेला आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिवाजीनगर भागात शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोन अनोळखी महिलांवर कलम ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तुमची श्रीमंत महिलांसोबत ओळख करुन देऊ. त्या महिलांसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, अशी ऑफर सदर महिलेला फोनवरून देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शिवाजीनगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहतात. शुक्रवारी फिर्यादी यांच्या मोबाईल फोनवर अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या महिलेने फिर्यादी यांना ‘आम्हाला तुम्हाला घरकाम किंवा काही रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समाजातील उच्च व श्रीमंत महिलांची ओळख करुन देऊ. तुम्हाला त्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील,’ अशी ऑफर फोन करणाऱ्या महिलेने फिर्यादी यांना दिली. दरम्यान, या सर्व विचित्र प्रकारानंतर सदर महिला प्रचंड घाबरली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत आपल्याला आलेल्या फोन कॉलबद्दल माहिती दिली. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहे.