प्रतीक्षा संपली...! सुरेश जैन लवकरच जळगावात परतणार, ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 5, 2022

प्रतीक्षा संपली...! सुरेश जैन लवकरच जळगावात परतणार, ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर

https://ift.tt/JjEe8Mn
जळगाव : जळगाव शहरात ठिकठिकाणी माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या स्वागताचे बॅनर लागल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात सुरेश दादा जैन यांना नुकताच नियमित जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे सुरेश दादा जैन हे पुन्हा जळगावात परताहेत का? यासह विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जळगावकरांची प्रतीक्षा संपली, आदरणीय दादासाहेब आपल्या जळगाव नगरीत स्वागत अशा आशयाचे फलक आहेत. समस्त सुरेश दादा प्रेमी व युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने सुरेश दादा जैन यांच्या स्वागतार्ह जळगाव शहरातील विविध चौकांमध्ये लावण्यात आल्याचं पहायला मिळतय. सुरेश दादा जैन यांचे हे फलक जळगावकरांच्या चर्चेचा विषय बनली आहेत. सुरेश दादा जैन यांना २०१२ मध्ये अटक झाल्यानंतर व त्यानंतर ते मुंबईलाच होते. आता नियमित जामीन झाल्याने तब्बल दहा वर्षानंतर सुरेश दादा जळगावला परतणार असल्याची चर्चा असल्याने त्यांचे समर्थक तसेच उद्धव ठाकरे गट व युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण पसरलं आहे. विकास कामांबाबतची मोठी दूरदृष्टी सुरेश दादा जैन यांच्याकडे आहे. सर्व पक्ष नेत्यांमध्ये समन्वय साधून जळगावच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा जळगावकर नागरिकांना आहे. त्यामुळे सुरेश दादा जळगावला कधी परत येतील व जळगावचा विकास करतील, याची उत्सुकता जळगावकरांना लागली आहे. आपल्या हक्काचा माणूस लवकरच जळगाव परतणार आहे, असे युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडिया यांनी म्हटले आहे.