भारतीय क्रिकेटवर दुःखाचा डोंगर कोसळला; जलद गोलंदाजाचे २८व्या वर्षी निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 14, 2023

भारतीय क्रिकेटवर दुःखाचा डोंगर कोसळला; जलद गोलंदाजाचे २८व्या वर्षी निधन

https://ift.tt/GSRoiAb
नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटू यांचे वयाच्या २८व्या वर्षी निधन झाले. सिद्धार्थ आजारी होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सिद्धार्थ विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेशच्या संघाकडून खेळला होता. या स्पर्धात हिमचालने विजेतेपद देखील मिळवले होते. इतक्या लहान वयात सिद्धार्थने निरोप घेतल्याने भारतीय क्रिकेट विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. हिमचालचा संघ सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे आणि सिद्धार्थ या संघासोबत होता. सिद्धार्थ शर्माच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शोक व्यक्त केला आहे. हिमाचल सीएमओने एक ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की," मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांनी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघातील सदस्य आणि स्टार जलद गोलंदाज सिद्धार्थ शर्माच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे."वाचा- जलद गोलंदाज सिद्धार्थ आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. काही कारणामुळे तो खेळू शकत नव्हता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वृत्त समोर आले होते आणि तो लवकरच संघात दाखल होईल असे म्हटले गेले. मात्र त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि सिद्धार्थला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वाचा- सिद्धार्थ रणजी ट्रॉफीत संघाकडून खेळत होता. ही स्पर्धा देशातील विविध शहरात होत आहे. प्रकृती बिघडल्याने त्याला गुजरातमधील वडोदरा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.वाचा- हिमाचलकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सिद्धार्थचे क्रिकेट करिअर फार मोठे नव्हते. त्याने हिमचालकडून लिस्ट ए मधील ६ सामने खेळले. तर विजय हजारे ट्रॉफीत त्याने एकच टी-२० मॅच खेळली होती.