वर्ल्डकप विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची स्पेशल घोषणा, उद्या टी-२० सामन्यापूर्वी... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 31, 2023

वर्ल्डकप विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची स्पेशल घोषणा, उद्या टी-२० सामन्यापूर्वी...

https://ift.tt/X7icmrt
मुंबई: भारताच्या मुलींनी दक्षिण आफ्रिकेत खेळला गेलेला अंडर-19 टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या विश्वचषकावर भारताच्या मुलींनी आपले नाव कोरले आहे. रविवारी टीम इंडियाने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत महिला टी-२० विश्वचषकाचे विजयी उद्घाटन केले. टीम इंडियाच्या या दणदणीत विजयानंतर बीसीसीआयची मानही अभिमानाने उंचावली आहे. भारताच्या या विजयानंतर बासीसीआयने ५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आणखी एक घोषणा केली आहे.जय शाह यांची घोषणा जय शाह यांनी ट्विट करत म्हटले, 'भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे पदाधिकारी १ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ६:३० वाहत भारताच्या अंडर-१९ महिलांच्या क्रिकेट संघाला शुभेच्छा देतील. या युवा क्रिकेटपटूंनी भारताचे नाव रोशन केले आहे आणि आम्ही त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांचा गौरव करणार आहोत.' वाचा: तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मुलींचा चॅम्पियन संघ उपस्थित असणार यापूर्वी जय शाह यांनी ट्विट करत म्हटले होते की, मी शेफाली वर्मा आणि तिच्या विजयी संघाला नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे १ फेब्रुवारीला तिसऱ्या टी-२० सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करतो. ही कामगिरी निश्चितच एक सेलिब्रेशन म्हणावे लागेल. बक्षीस रकमेची घोषणा करताना जय शाह म्हणाले – भारतात महिला क्रिकेट वृद्धिंगत होताना दिसत आहे आणि विश्वचषकाच्या विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा अधिक उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच एक मार्ग तोडणारे वर्ष आहे.हेही वाचा: पॉचेफस्ट्रुममध्ये रविवारी शेफालीच्या संघाने शानदार क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला अवघ्या ६८ धावांत गुंडाळले. वेगवान गोलंदाज तितस साधू, ऑफ-स्पिनर अर्चना देवी आणि लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा त्यांच्या लाइन आणि लेन्थमध्ये अचूक होते. त्याने प्रत्येकी दोन विकेट घेतले. शेफाली, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रभावी गोलंदाजी करताना प्रत्येकी एक विकेट मिळवली.