मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज (२४ जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने नऊ गडी गमावून न्यूझीलंडसमोर ३८५ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, न्यूझीलंडला हे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने ४१.२ षटकांत फक्त २९५ धावाचं केल्या. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या काही खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट होती. हे खेळाडू या सामन्याचे हिरो ठरले आहेत. रोहित शर्मा:कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने ८५ चेंडूत १०१ धावांची स्फोटक शतकीय खेळी खेळली. यादरम्यान, त्याने ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले. याशिवाय त्याने या सामन्यात उत्कृष्ट कर्णधारपदाने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.हेही वाचा -हार्दिक पांड्या:जर हार्दिक पांड्या नसता तर भारतीय संघ ३०० ते ३५० इतक्याच धावा करु शकला असता. पण, हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर खेळायला आला आणि त्याने ३८ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. शुभमन गिल:संपूर्ण मालिकेत शुभमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. या सामन्यात तो सलामीला उतरला आणि डावाची सुरुवात करताच त्याने ७८ चेंडूत ११२ धावांची दमदार शतकी खेळी खेळली. या खेळाडूने भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करून दिल्याने संघाला मोठी धावसंख्या गाठता आली.हेही वाचा -शार्दुल ठाकूर:शार्दुल ठाकूरने इंदूरमध्ये भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने १७ चेंडूत २५ धावांची मौल्यवान खेळी करत मोठे लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखलं. त्याने दोन चेंडूत दोन विकेट्स घेत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. शार्दुल ठाकूरला 'प्लेअर ऑफ द मॅच' देण्यात आलं. कुलदीप यादव:या सामन्यात कुलदीप यादवने धडाकेबाज गोलंदाजी करत ६२ धावा देत तीन विकेट्स काढण्यात यश मिळवले. त्याने महत्त्वाच्या प्रसंगी या विकेट घेतल्या त्यामुळे विरोधी फलंदाजांनी आपली लय गमावली आणि हा सामना भारताने जिंकला.
https://ift.tt/eYitcxX