ऑनलाइन जाहिरात पाहून शेतकऱ्याने ९५ हजारांची बैलजोडी मागवली, पण पुढे घडलं विपरीत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 24, 2023

ऑनलाइन जाहिरात पाहून शेतकऱ्याने ९५ हजारांची बैलजोडी मागवली, पण पुढे घडलं विपरीत

https://ift.tt/cFdRLlD
बीड: धारूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने फेसबुकवरील जाहिरात पाहून खरेदीसाठी बैलजोडी बुक केली होती. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने या शेतकऱ्याकडून वेगवेगळ्या कामासाठी ९५ हजार रुपये आपल्या खात्यात टाकायला सांगितले. मात्र, अज्ञात व्यक्तीने बैल जोडी न देता इतर उडवा- उडवीची उत्तर दिली. त्यामुळं शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तात्काळ शेतकऱ्याने पोलीस ठाणे गाठले. ()आतापर्यंत ऑनलाईनच्या विक्रीसाठी फसवणूक करणारे वेगवेगळ्या जाहिराती दाखवून नागरिकांना आमिष दाखवतात. आपल्याकडील ऑनलाईन वस्तू लोकांनी खरेदी करावी यासाठी वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून लोभ दाखवून नागरिकांची फसवणूक केलेली आपण आत्तापर्यंत पाहिली आहे. मात्र बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात कारी गावातील ज्ञानेश्वर दगडू फरताडे यांनी फेसबुकवर आलेल्या जाहिरात पाहून आपल्या शेतात काम करण्यासाठी बैलजोडी बुक केली. मात्र बौलजोडी बुक केल्यानंतर त्याला वेगवेगळे कारण देत अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याकडून जवळपास ९५ हजार रुपये मागितले. हा सगळा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याने नेमका समोरील व्यक्ती कोण हे शेतकऱ्याला माहीती नव्हतं.वाचाः ९५ हजार दिल्यानंतर बैल जोडीची मागणी शेतकऱ्यांनी अनेक वेळा अज्ञात व्यक्तीकडे केली. मात्र उडवा उडवीच्या उत्तरानंतर शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं. मात्र अशा पद्धतीने ऑनलाईन विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत या कंपन्याद्वारे ऑनलाईन खरेदी करणारे लाखो ग्राहक आहे मात्र या लाखो ग्राहकांमध्ये ४०% लोकांची ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाल्याचं अनेक वेळा उघड झालं आहे. मात्र अशा पद्धतीच्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांवर चाप बसवण्यासाठी सायबर क्राईमकडे नागरिकांनी तक्रारी दाखल कराव्यात असं अवाहन वेळोवेळी करण्यात येतं. तसंच, अशा पद्धतीच्या फेक ऑनलाईन खरेदी करण्यापासून नागरिकांनी सतर्क राहावं, असा आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे.वाचाः