
यवतमाळ: अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील शेलोडी गावात घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती.शेलोडी येथील रामचंद्र गावंडे (८०) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यांच्यावर दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शेलोडीची स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. याचवेळी आगीच्या धुरामुळे तेथे असलेल्या दोन आग्या मोहांनी नागरिकांवर हल्ला केला.हेही वाचा - त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकात एकच गोंधळ निर्माण होऊन पळापळ सुटली. यावेळी माशांनी अनेक नागरिकांवर हल्ला केला. यात ३० ते ४० नागरिक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गंभीर जखमींना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर येथील डॉक्टर उपचार करीत आहे.हेही वाचा -या हल्ल्यात किशोर सूर्यवंशी (४०), पुरुषोत्तम भेंडे (५०), भीमराव गावंडे (६५), भाऊराव इंगळे (७६), प्रकाश नवरंगे (६०), महादेव अघोळे (६६), नामदेव लवारे (७५), वासुदेव कावळे (५५), बाळकृष्ण सुपारे (५५), राजकुमार गावंडे (५०), बाबाराव काळे (६३), रवींद्र ठाकरे (६३), प्रभाकर भोयर (५५), शाम चव्हाण (४५), भीमराव गावंडे (७०), लहू चव्हाण (७०), दत्ता पाटील(५५), श्रीधर कानकिरेड (६८) यांच्यासह ३०ते ४० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शेलोडी येथील नागरिकांचाही समावेश आहे.हेही वाचा -