टपरी बंद करुन घरी निघाला, मात्र घर गाठताच आलं नाही; वाटेतच तरुणावर काळाचा घाला - Times of Maharashtra

Wednesday, January 25, 2023

demo-image

टपरी बंद करुन घरी निघाला, मात्र घर गाठताच आलं नाही; वाटेतच तरुणावर काळाचा घाला

https://ift.tt/KzQDHG4
photo-97294560
रत्नागिरीः रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील आरेवारे मार्गावर दुचाकीच्या धडकेत एका ३५ वर्षीय झाला आहे. आरे वारे येथे टपरी चालवण्याचा व्यवसाय असलेले शैलेंद्र पंढरीनाथ कदम (वय ३५ राहणार कोतवडे,रत्नागिरी) हा तरुण आपल्या घरी निघाला होता. याचवेळी दुचाकीची जोरदार धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. ()सोमवारी रात्री आपली टपरी बंद करून शैलेंद्र पायी घरी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी शैलेंद्र याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गोपाळ कुळ्ये (रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेंद्र पंढरीनाथ वारेकर (३५, रा. कोतवडे, रत्नागिरी) हे आरे-वारे पॉईंट येथे टपरी चालवण्याचा व्यवसाय करायचे. दिवसभर टपरीवर काम केल्यानंतर सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे टपरी बंद करून ते आपल्या निवासस्थानी जात होते. मात्र त्यांना घर गाठताच आले नाही. त्याच सुमारास विजय कुळ्ये दूचाकी (एमएच-0८- एएम-७८९३) वरुन भरधाव वेगाने गणपतीपुळे ते रत्नागिरी असा येत असताना त्याने पादचारी शैलेंद्रला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि शैलेंद्र गंभीर जखमी झाले. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी शैलेंद्र यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथिल वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शैलेंद्रला तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.वाचाः

Pages