
बुलढाणा : विकास म्हटला की फक्त गुळगुळीत रस्ते तेही फक्त शहराला जोडणारे असा आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो. स्वच्छता म्हटलं म्हणजे फक्त शहरांमधील मोठ्या कॉलनीची अनेकांना आठवण होते. मात्र, शहराच्या बरोबरीने आपली वाटचाल करणारी एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना ग्रामपंचायतीकडे बघावा लागतं. जनुना ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा गोरे त्यांचं सरपंचपदाचं मानधन सुद्धा शाळेसाठी देतात. खामगाव पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामीण जनुना हे गाव आहे. तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात वीज ,रस्ते ,शिक्षण , स्वच्छता आणि मुबलक पाणी मिळतं. सुवर्णा गोरे यांच्या संकल्पनेतून गावातील शाळेत दर्जेदार शिक्षण मिळतं. या गावातील खुले वाचनालयाची संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.सुवर्णा गोरे यांनी कोणताही राजकीय वारसा किंबहुना अनुभव नसताना थेट प्रथमच निवडणूक लढवली. निवडणुकीत विजयी होत त्या सरपंच बनल्या. सरपंच म्हणून काम करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. सुवर्णा गोरे यांनी गावाच्या विकासासाठी आव्हान स्वीकारलं. अंडरग्राउंड ड्रेनेज, प्रत्येक घरात नळ आणि आता गावात आरो प्लांट पूर्णत्वास येत आहे, असल्याचं गोरे यांनी सांगितलं. सुवर्णा गोरे यांनी विशेषता शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा उत्तम असावा यासाठी विशेष लक्ष ठेवलं आहे. सरपंचपदाचं मिळणारं मानधन देखील त्या शाळेसाठी देतात. शाळेत अचानक भेट देत विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकाशी संवाद साधतात. थेट वर्गामध्ये जाऊन अनपेक्षित भेट देखील देतात. सुवर्णा गोरे यांनी जनुना गावासाठी चांगले रस्ते ,स्वच्छता पिण्याचे पाणी, अंडरग्राउंड ड्रेनेज या सोयी सुविधा नि्र्माण व्हाव्यात म्हणून काम सुरु केलं आहे. स्वतःचे मानधन देखील न घेता एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून गावाचा विकासाचां ध्यास सरपंच सुवर्णा गोरे यांनी घेतला आहे. हा त्यांचा ध्यास निश्चित कौतुकास्पद आहे. सुवर्णा गोरे यांच्या कामाबद्दल बोलताना ग्रामस्थ पुरुषोत्तम कोळसे यांनी आम्हाला पूर्वी पाण्यासाठी पायपीटक रावी लागत होती. पण आता चित्र बदललं असल्याचं त्यांनी सांगितलं.