छप्पर फाडके! यावर्षी होणार घसघशीत वेतनवाढ; पाहा, कोणत्या सेक्टरमध्ये किती वाढणार कर्मचाऱ्यांचा पैसा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 17, 2023

छप्पर फाडके! यावर्षी होणार घसघशीत वेतनवाढ; पाहा, कोणत्या सेक्टरमध्ये किती वाढणार कर्मचाऱ्यांचा पैसा

https://ift.tt/GzkQXnC
नवी दिल्ली : भारतीय कंपन्या यावर्षी सरासरी ९.८ टक्क्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवू शकतात असा अंदाज आहे. गेल्या वर्षी २०२२ मधील ९.४ टक्क्यांच्या वाढीपेक्षा ही वाढ किंचित जास्त आहे. कॉर्न फेरीच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, ही वाढ टॉप टॅलेंटसाठी जास्त असेल. कंपन्या विविध टॅलेंट मॅनेजमेंट टप्पे आणि नुकसान भरपाई योजनांद्वारे महत्त्वाच्या आणि हुशार कर्मचारी टिकवून ठेवण्यावर भर देत आहेत. सर्वेक्षणात ८,००,००० कर्मचारी असलेल्या ८१८ संस्थांचा समावेश करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार २०२३ मध्ये भारतात पगारात ९.९ टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे.यावर्षी होईल घसघशीत वाढ सन २०२० या मधील करोनामुळे प्रभावित झालेल्या वर्षात ६.८ टक्क्यांपेक्षा खूपच कमी होती. परंतु सध्याचा वाढीचा कल अधिक मजबूत आणि चांगली स्थिती दर्शवत असल्याचे दिसते. डिजिटल क्षमता निर्माण करण्यावर भारताच्या विशेष भर दिला. या अनुषंगाने, सर्वेक्षणानुसार लाइफ सायन्स, आरोग्य सेवा आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढ अनुक्रमे १०.२ टक्के आणि १०.४ टक्के इतकी आहे.क्लिक करा आणि वाचा- काही लोकांना ३०% पर्यंत मिळेल वाढकॉर्न फेरीचे अध्यक्ष आणि प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक नवनीत सिंग यांनी माहिती देताना सांगितले की, 'जगभरात मंदीची चर्चा आहे. पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सहा टक्के दराने वाढ अपेक्षित आहे. प्रमुख प्रतिभांसाठी पगारवाढ १५ ते ३० टक्क्यांपर्यंत असू शकते.'क्लिक करा आणि वाचा- कोणत्या क्षेत्रात किती वाढ? अनेक क्षेत्रांमध्ये पगारवाढ चांगली होणार आहे. याबाबतच्या माहितीनुसार सेवा क्षेत्रासाठी ९.८ टक्के, वाहन क्षेत्रासाठी ९ टक्के, रसायनांसाठी ९.६ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी ९.८ टक्के आणि रिटेलसाठी ९ टक्के इतक्या वाढीचा अंदाज आहे.क्लिक करा आणि वाचा-