विदर्भाच्या कापूस पंढरीत तुरीला झळाळी, अकोल्याच्या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 28, 2023

विदर्भाच्या कापूस पंढरीत तुरीला झळाळी, अकोल्याच्या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव

https://ift.tt/TQRmogV
अकोला : राज्यात तुरीला सध्या चांगला दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज राज्यातील अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीचे सर्वाधिक दर होते. अकोल्याच्या बाजारात आज तुरीची आवक १ हजार ७१६ क्विंटल इतकी होती, तर तुरीला सरासरी ५ हजार ८०० पासून ७ हजार ४४५ रुपयांपर्यत प्रतिक्विंटल दर मिळाला. तर अकोटचा बाजार आज बंद असल्याने फक्त कापसाची खरेदी सुरू होती. इथे ८ हजार ६०० रुपये दरम्यान कापसाला भाव मिळालाय. तुरीच्या बाजार भावातील तेजी कायम राहिल्यास आगामी दिवसात हे भाव सहजपणे वाढू शकतील. सध्या महाराष्ट्रासह अनेक बाजारांमध्ये तुरीची आवक सुरु सुरू आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये तुरीची लागवड उशिरा झाल्याने तूर काढणीही उशिरा होत आहे. त्यामुळे ही तूर जानेवारीच्या अखेरपर्यत बाजारात दाखल होऊ शकते, असेही समजते. दरम्यान, यंदा तुरीच्या लागवड क्षेत्राच्या तुलनेत तुरीची मागणी बाजारात अधिक असल्याचे समजते, त्यामुळ तुरीचं भाववाढीचं सर्वात मोठं कारण. असेही कळते.