प्रतिक्षा संपली, देशातील सर्वात मोठा FPO आज येतोय! खरेदी करण्यापूर्वी मुख्य गोष्टी जाणून घ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 27, 2023

प्रतिक्षा संपली, देशातील सर्वात मोठा FPO आज येतोय! खरेदी करण्यापूर्वी मुख्य गोष्टी जाणून घ्या

https://ift.tt/9ibSA4f
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानींची कंपनी अदानी समूह बाजारातून २०,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. अदानी समूहाची कंपनी २७ जानेवारी म्हणजे आज फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) आणणार आहे. एफपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर कंपनी नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करेल. तुम्हीही अदानी एंटरप्रायझेसच्या या ऑफरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी या ९ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.किती शेअर्स विक्रीलाकंपनी एफपीओमध्ये एकूण ६,४७,३८,४७५ इक्विटी शेअर्स विक्रीला आणणार आहे. गुंतवणूकदारांना किमान चार स्लॉटसाठी बोली लावता येईल. कंपनीने ३११२ रुपये ते ३२७६ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. लोअर बँडवर १३.५ टक्के सूट दिली जात आहे.किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सूटअदानी एफपीओ ऑफरमध्ये किरकोळ बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी इक्विटी शेअर्सची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना प्रती शेअर्सवर ६४ रुपयांची सवलत मिळणार आहे.अँकर गुंतवणूकदारांसाठी खुलाअँकर गुंतवणूकदारांसाठी एफपीओ २५ जानेवारी रोजी उघडला आहे. तर अंतिम तारीख ३१ जानेवारी ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी किरकोळ गुंतवणूकदारांसह उर्वरित गुंतवणूकदारांसाठी २७ जानेवारी रोजी एफपीओ उघडेल. एफपीओमध्ये 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.दुसरा सर्वात मोठा एफपीओअदानी एंटरप्रायझेसचा हा एफपीओ भारतातील दुसरा सर्वात मोठा एफपीओ असेल. या एफपीओतून कंपनी २९ हजार कोटी रुपये उभारणार आहे. भारतातील सर्वात मोठा एफपीओ कोल इंडियाने २०१५ मध्ये आणला होता. यामध्ये २२ हजार ५५८ कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यात आले होते.भांडवलाचा वापरएफपीओ मधून उभी केलेली रक्कम अदानी एंटरप्रायझेस अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड, अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड आणि मुंद्रा सोलर लिमिटेड सारख्या संस्थांचे काही कर्ज फेडण्यासाठी वापरू शकते.या योजनांवर कामउभारलेल्या पैशातून अदानी एंटरप्रायझेसने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांसाठी १० हजार ८६९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सध्याच्या विमानतळांवर काम करण्याबरोबरच ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे चे बांधकामही करता येईल.कंपन्यांचे शेअर होल्डिंगअॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, बीओबी कॅपिटल मार्केट्स, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज, जेएम फायनान्शिअल, आयआयएफएल सिक्युरिटीज, मोनार्क नेटवर्थ कॅपिटल आणि इलारा कॅपिटल यांचा अदानी एंटरप्रायझेसमध्ये हिस्सा आहे.अदानी एंटरप्रायझेसचे शेअर होल्डिंगअदानी एंटरप्रायझेसमध्ये प्रवर्तकांकडे सुमारे ७२.६३ टक्के हिस्सा आहे. तर २७.२७ टक्क्यांपैकी २० टक्के विमा हिस्सा कंपन्यांकडे आणि उर्वरित परदेशी गुंतवणूकदारांकडे आहे.अदानी समूहाचा व्यवसायअदानी समूहाचा व्यवसाय विमानतळ, रस्ते, वीज, हरित ऊर्जा, विद्युत पारेषण, गॅस वितरण, रिअल इस्टेट, एफएमसीजी आणि सिमेंट आदी क्षेत्रांमध्ये आहे.एफपीओ म्हणजे काय?फॉलो-ऑन पब्लिक ऑफर म्हणजे एफपीओ ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेअर बाजारात आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी विद्यमान भागधारकांना किंवा नवीन गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स जारी करते. हे आयपीओ पेक्षा वेगळे आहे. आयपीओमध्ये कंपनी प्रथमच निधी उभारण्यासाठी आपले शेअर जारी करते. एफपीओ च्या माध्यमातून कंपनी आपला इक्विटी बेस वाढवते.एफपीओमध्ये नक्की काय होते?एफपीओमध्ये जारी केलेल्या शेअर्सची किंमत बाजारभावापेक्षा कमी असते. कमी किमतीत शेअर्स जारी करण्यामागील प्राथमिक हेतू हा त्याच्या इश्यूसाठी अधिक ग्राहकांना आकर्षित करणे हा आहे. तथापि, सबस्क्रिप्शनमधील शेअर्सची किंमत कमी असल्याने अनेकदा बाजारभाव देखील खाली येतो आणि तो एफपीओ किंमतीच्या जवळ पोहोचतो.