Share Market Opening: बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात, अदानींचे शेअर्स पुन्हा आपटले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 27, 2023

Share Market Opening: बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात, अदानींचे शेअर्स पुन्हा आपटले

https://ift.tt/ZxCderI
मुंबई: भारतीय आज आठवड्याच्या शेवटच्या व्यापाराच्या दिवशी घसरणीने झाली असून मार्केटची वाटचाल अस्थिर दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक आज पुन्हा लाल चिन्हाने उघडले. तर आज आशियाई बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत, मात्र रशियन बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काल देशांतर्गत शेअर बाजार बंद होते, मात्र आज बाजारात व्यापाराचे कोणतेही स्पष्ट संकेत दिसत नाहीत.बाजाराच्या सुरुवातीची स्थितीशेअर मार्केटच्या सुरुवातीला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४.७५ अंकांच्या किंचित घसरणीसह १७,८७७.२० अंकांवर उघडला. याशिवाय मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ३८.१६ अंकांनी घसरून ६० हजार १६६.९० वर खुला झाला. अशाप्रकारे, सेन्सेक्स आणि निफ्टीमधील व्यवहार केवळ लाल चिन्हात सुरु झाले. बँक निफ्टीतही मोठी घसरण दिसून येत आहे.दुसरीकडे, सेन्सेक्स आणि निफ्टीच्या समभागांबद्दल बोलायचे तर बीएसईचे ३० पैकी १७ शेअर्स वाढले तर उर्वरित १३ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. त्याचवेळी निफ्टीच्या ५० पैकी ३२ शेअर्सने उसळी घेतली, तर १६ समभागात घसरण दिसत आहे. तसलेच २ समभाग कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहे. सकाळी ९.४५ वाजता बाजाराच्या स्थितीबद्दल बोलायचे तर सेन्सेक्स ५०६ अंक किंवा ०.८४ टक्क्यांनी घसरून ६० हजार अंकांच्या खाली घसरला तर निफ्टी १२८ अंक किंवा ०.७२ टक्क्यांच्या घसरणीसह १७,७६३.३५ वर व्यवहार करत आहे.अदानी समूहात उलथापालथ सुरूचकाही दिवसांपूर्वी आलेल्या एका रेपपोर्टमुले गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या समभागात आजही प्रचंड घसरण पाहायला मिळाली. अदानी विल्मर ५ टक्क्यांनी ५१६.८५ रुपयांवर घसरला, तर अदानी पोर्ट्समध्ये सुमारे ३ टक्के घसरण झाली आणि प्रति शेअर ६९१.९० रुपयावर पोहोचला. तारसेच अदानी पॉवरमध्येही ५ टक्के घट झाली असून त्याची किंमत प्रति शेअर २४७ रुपयांपर्यंत खाली पडला. अदानी एंटरप्रायझेस, ज्यांचा एफपीओ आज खुला होणार आहे, २.२७ टक्क्यांनी घसरून ३३११.९० रुपये प्रति शेअरवर आला आहे. दरम्यान, अदानी ट्रान्समिशनमध्ये सर्वाधिक १३.६५ टक्क्यांची घसरण झाली असून त्याची किंमत २,१७४ रुपयांपर्यंत घसरली आहे. या शेअरमध्ये ३४३ रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड १०.०७ टक्क्यांनी घसरल्यानंतर १८७ रुपयांनी घसरून १६७०.६५ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.क्षेत्रीय निर्देशकांची स्थितीआजच्या सकाळच्या व्यवसाय सत्रात तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, पीएसयू बँक, मीडिया, धातू, एफएमसीजी आणि वित्तीय समभागांमध्ये घसरण झाली. तर ऑटो शेअर्स आज जबरदस्त तेजीत दिसत असून निर्देशकांत १.९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.बुधवारीही घसरणीचे सत्र२५ जानेवारी, बुधवारी देखील मार्केटमध्ये घसरण झाली आणि सेन्सेक्स ७७३ अंक म्हणजेच १.२७ टक्क्यांनी घसरून ६० हजार २०५ च्या पातळीवर बंद झाला.