महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षक मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य, इंग्रजी सिनेमेही आवडीनं पाहतो. चांगल्या कलाकृतीला डोक्यावर घेतो तर सुमार सिनेमांकडे पाठही फिरवतो. एकीकडे '' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होत असतानाच '', '', 'व्हिक्टोरिया', 'सरला एक कोटी', 'बांबू', 'पिकोलो' सारख्या मराठी सिनेमांनाही प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळतेय. यातील 'वेड' आणि 'वाळवी' सिनेमांनी तर अनुक्रमे पाचव्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपटगृहांमध्ये 'हाऊसफुल्ल'ची पाटी लावली आहे.महाराष्ट्रात बहुतांश वेळा बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांची चलती असायची. कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची. मराठी सिनेमांना डावललं जायचं. आता हे चित्र बदलू लागलंय. मराठी सिनेमेही बॉलिवूडपेक्षा वरचढ ठरत आहेत. याचं ताज उदाहरण म्हणजे रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी'. आठवड्याभराच्या अंतरानं प्रदर्शित झालेल्या या दोन मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणलं आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रात सिनेमांची अनोखी सकारात्मक स्पर्धा दिसून येतेय. सिनेमागृह व्यावसायिक आवर्जून मराठी चित्रपटांचे शो लावत आहेत. त्यांना मराठी प्रेक्षकदेखील भरभरून प्रतिसाद देताहेत. 'पठाण' सिनेमाची कमाई मराठी सिनेमांच्या तुलनेत अधिक असली तरी हिंदीला देत असलेली टक्कर कौतुकास्पद असल्याचं जाणकार सांगतात.हिंदीच्या शर्यतीत'पठाण'सारखा बिग बजेट सिनेमा शर्यतीत असतानाही 'वाळवी' चित्रपटानं तिसऱ्या आठवड्यातही आपलं स्थान कायम ठेवलंय. यावरून मराठी प्रेक्षक 'वाळवी'सारख्या प्रयोगशील सिनेमाला पसंती देत असल्याचं दिसून आलंय. तर दुसरीकडे 'वेड'सारख्या प्रेमकथेला प्रेक्षक गर्दी करताहेत. काही थिएटरमध्ये सध्या चालू आठवड्यातील 'वाळवी'चे शोज तिपटीनं वाढवण्यात आले आहेत. तर 'वेड' सिनेमा आणखी एक आठवडा चित्रपटगृहात कायम राहील अशी सिनेमागृह व्यवस्थापकांच्या गटात चर्चा आहे.आनंददायी चित्रतिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून 'वाळवी'चे शोज वाढवण्यात आले आहेत. सध्या 'पठाण' सारख्या बॉलिवूड चित्रपटाची चलती असतानाही 'वाळवी'वरही प्रेक्षक तेवढंच प्रेम करत आहेत. हिंदी चित्रपटासमोर मराठी सिनेमा ताकदीनं उभा आहे, हेच खूप आनंददायी आहे.- मंगेश कुलकर्णी, बिझनेस हेड, झी स्टुडिओजमराठीकडे ओढाराज्यभरातील सिनेपोलिस चित्रपटगृहात मराठी सिनेमांना आम्ही सातत्यानं प्रोत्साहन देण्याचं काम करत आलो आहोत. 'वेड', 'वाळवी' सिनेमाला दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक मिळाला. अॅडव्हान्स बुकिंगदेखील वाढलं. त्यामुळे आपसूकच सिनेमाचे शो वाढले. 'सरला एक कोटी', 'बांबू', 'पिकोलो' हे मराठी सिनेमेदेखील प्रेक्षक पाहत आहेत. आजच्या तारखेला सिनेमागृहात मराठी आणि हिंदी सिनेमा आनंदानं नांदत आहेत.- सुयोग वेंगुर्लेकर, सिनेपोलिस चित्रपटगृहआमने-सामने'वेड' आणि 'वाळवी' हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट माऊथ पब्लिसिटीमुळे गेला महिनाभर सिनेमागृहात कायम आहेत. 'पठाण' हाऊसफुल्ल होतोय ही चांगली गोष्ट आहे; पण मराठी सिनेमेही त्याला टक्कर देत हाऊसफुल्ल ठरताहेत याचा आनंद अधिक आहे. असं चित्र यापूर्वीही मराठी सिनेविश्वानं पाहिलं आहे. 'नटरंग'-'थ्री इडियट्स', 'दुनियादारी'-'चेन्नई एक्स्प्रेस', 'कट्यार काळजात घुसली'-'प्रेम रतन धन पायो', 'व्हेंटिलेटर'-'शिवाय', 'फास्टर फेणे'-'सिक्रेट सुपरस्टार', 'डॉ. काशिनाथ घाणेकर', 'नाळ'-'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सारखे मराठी-हिंदी सिनेमे आमने-सामने होते. पण, मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठामपणे उभे राहिले.- सादिक चितळीकर, सिनेमा वितरक