काय झाले कळलेच नाही, १७ विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडल्या, ५ गंभीर, पुढे तपासात कारण झाले उघड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 2, 2023

काय झाले कळलेच नाही, १७ विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडल्या, ५ गंभीर, पुढे तपासात कारण झाले उघड

https://ift.tt/u4xwCkA
: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये विषारी वायूमुळे अनेक विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्या. मुख्यमंत्री कार्यालयाने हे प्रकरण गंभीरपणे घेत या प्रकरणाच्या तपासासाठी एका समितीचे गठन केले आहे. या दुर्घटनेत विषारी वायूमुळे गंभीर झालेल्या विद्यार्थिनींची संख्या आता १७ झाली आहे. यांपैकी ५ विद्यार्थिनींना उपचारासाठी लखनऊला पाठवण्यात आलं आहे. सीएमओ डॉ. अवधेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाळण्यात आलेल्या औषधांमधून प्राणघातक वायू कार्बन मोनॉक्साईडमुळे ही दुर्घटना घडली आहे. या विषारी वायूचा शरीराच्या इतर भागांसह हृदय आणि मेंदूवर परिणाम होतो.नगर कोतवाली भागातील कमरियाबाग येथील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या वर्गात विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध झाल्या. यांपैकी ५ विद्यार्थिनींना बेशुद्ध अवस्थेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर काही विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. हे लक्षात येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. अशा विद्यार्थिनींची संख्या आता १७ झाली. यांपैकी गंभीर असलेल्या अफजा सिद्दीकी, नाझिया अन्सारी, फलक सिद्दीकी, मानवी आणि इमरा यांना लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे खुशी गुप्ता, अस्लान अली, अशिंका वर्मा, हुडा, इलाहम, मोहम्मद अमील, शेख अमीन, नॅन्सी यादव, श्रेया, शौर्य मिश्रा, तुबा आणि अकाउंटंट लाइक खान यांना जिल्हा रुग्णालयात ट्रॉमामध्ये दाखल करण्यात आले.क्लिक करा आणि वाचा- कार्बन मोनॉक्साईड वायूमुळे विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्या - CMOतपासासाठी घटनास्थळी पोहोचलेले सीएमओ डॉ. अवधेश सिंह यादव यांनी सांगितले की, शाळेच्या हद्दीतील स्मशानभूमीत भंगाराचे काम करणारे शेखू, शेराली, बबलू यांनी खासगी रुग्णालयातून बायोमेडिकल वेस्ट आणून जाळला. हा कचरा खासगी रुग्णालयातून आणला गेला होता. कालबाह्य झालेली काही औषधे जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडला, त्यामुळे १५ विद्यार्थिनी गंभीर झाल्या.क्लिक करा आणि वाचा- पथकाने तपास केल्यानंतर कारवाईसीएमओने सांगितले की, हा अत्यंत घातक आहे. हृदय आणि मेंदूसोबतच शरीराच्या इतर भागांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. याप्रकरणी एक पथक गठित करण्यात आले असून, पोलिसांच्या मदतीने ही मुदत संपलेली औषधे कोणत्या रुग्णालयातून खरेदी करण्यात आली, याची चौकशी करण्यात येणार आहे.एजन्सी कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावतेसीएमओ डॉ. अवधेश सिंह यादव म्हणाले की, कालबाह्य झालेली औषधे जाळण्याची व्यवस्था नाही. ते जमिनीत गाडून किंवा खाजगी रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट एजन्सीद्वारे ते स्वतःच्या व्यवस्थेनुसार त्यांची विल्हेवाट लावतात.क्लिक करा आणि वाचा-