भाजप-राष्ट्रवादीत राडा, शाब्दिक चकमक, एकमेकांच्या अंगावर धावून गेले, खासदार विखे पाटील म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 6, 2023

भाजप-राष्ट्रवादीत राडा, शाब्दिक चकमक, एकमेकांच्या अंगावर धावून गेले, खासदार विखे पाटील म्हणाले...

https://ift.tt/UVqfBSQ
अहमदनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्याला मानणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकाचवेळी समोर आलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. असाच एक प्रकार रविवारी श्रीगोंदा तालुक्यात झाला. लोणी व्यंकनाथ गावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. कार्यकर्ते एकमेकांवर धाऊन गेले. मात्र, स्वत: विखे पाटील यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविला. ‘वाद घालू नका, सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत. झेडपीची निवडणूक होऊ द्या, सगळे ठीक होईल,’ असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.नगर -दौंड रस्त्याचे काम श्रीगोंदा तालुक्यात रेल्वे गेटजवळ बरीच वर्षे रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. त्याच्या भूमिपूजनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार विखे यांच्या प्रयत्नातून हे काम होत असल्याने कार्यक्रमही त्यांच्याच पुढाकारातून झाला. यासाठी भाजपसह राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. राष्ट्रवादीचे बजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी आपल्या भाषणात खासदार डॉ. विखे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर भाजपचे अ‍ॅड. काकडे यांनी बोलताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली. त्यावरून वादाला सुरवात झाली. सुरवातील नाहाटा आणि काकडे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. खासदार डॉ. विखे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या समोरच हे सर्व सुरू होते. तणाव वाढत जाऊन दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. अखेर विखे यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला. ते म्हणाले, ‘यापूर्वीच जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन गेली असती तर असे प्रसंग घडले नसते. कार्यकर्त्यांना मन मोकळे करण्यासाठी संधी हवी असते. अशा कार्यक्रमांतून ती मिळते. सगळे आपलेच आहेत. निवडणूक झाल्यावर ठीक होईल,’ असे म्हणत त्यांनी सर्वांना शांत केले. त्यानंतर पुढील कार्यक्रम पार पडला.क्लिक करा आणि वाचा- त्यांच्या पिताश्रींनी शब्द पाळला का? – विखे पाटीलमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आव्हान देणारे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना खासदार डॉ. विखे पाटील यांनी टोला लगावला आहे. विखे पाटील म्हणाले, ‘ज्यांनी मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले आहे त्यांच्या पिताश्रींनी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यांचा शब्द अंतिम असल्याचे सांगतात, तर मग तेच आपला शब्द का पाळत नाहीत? त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांने काहीही बोलले तरी त्याला महत्व राहत नाही,’ असेही विखे पाटील म्हणाले.क्लिक करा आणि वाचा-