राज ठाकरेंची महिलांसाठी खास पोस्ट; दिला 'हा' सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 8, 2021

राज ठाकरेंची महिलांसाठी खास पोस्ट; दिला 'हा' सल्ला

https://ift.tt/2PJPT64
मुंबईः आज जागतिक महिला दिन. जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांमधून नारीशक्तीला सलाम केला जात आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातूनही महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनीही महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, एक खास सल्लाही दिला आहे. राज ठाकरे हे नेहमीचं विशेष दिवशी सोशल मीडियावरुन शुभेच्छा देतात. यावेळीही राज यांनी फेसबुकवर राजकारणात समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी एक खास सल्ला दिला आहे. तुम्हाला कोणाचंही प्यादं बनून राहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. काय आहे राज ठाकरेंची पोस्ट? 'मूळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, 'बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील' त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे,' असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. वाचाः 'एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः