जळगावात खळबळ! पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यावर बंदुक रोखली अन्....; पाहा थरारक व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 25, 2023

जळगावात खळबळ! पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यावर बंदुक रोखली अन्....; पाहा थरारक व्हिडिओ

https://ift.tt/7kNt41y
जळगाव: अमळनेर शहरातील एका पेट्रोलपंपावर अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांकडून सुमारे ३६ हजार ५०० रूपयांची लुट केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. ही थरारक घटना पंपावरील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरूवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती हातात बंदूक घेवून आला. पेट्रोलपंपावर असलेल्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून सुमारे ३६ हजार ५०० रुपये लुटून नेले. यावेळी पेट्रोल पंपावर किशोर रविंद्र पाटील आणि नरेंद्र सोनसिंग पवार हे कार्यरत होते. यावेळी चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाच्या रुमालाने बांधलेला एक अनोळखी तरुण आला आणि त्याने पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवले. त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले.तसेच पेट्रोल पंपावर एक कार चालक पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याला देखील बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे देखील काढून घेतले. हा प्रकार पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.शुक्रवारी पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह पथकाने धाव घेवून भेट दिली व चौकशी करत माहिती जाणून घेतली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले असून संशयितांची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.