चेन्नईला मोठा धक्का, धोनीच्या दुखापतीबाबत आली आता मोठी अपडेट, खेळणार की नाही पाहा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 31, 2023

चेन्नईला मोठा धक्का, धोनीच्या दुखापतीबाबत आली आता मोठी अपडेट, खेळणार की नाही पाहा...

https://ift.tt/R209mpL
नवी दिल्ली : पहिल्या सामन्याला आता फक्त काही तासच उरले आहेत. पण त्यापूर्वी आता च्या संघासाठी आता मोठी अपडेट आली आहे. कारण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.बुधवारी धोनी सुरुवातीला नेट्सवर येण्यास संकोच करत होता आणि डावा पायात नीकॅप घातली होती. त्यानंतर धोनीने मैदानात पाऊल ठेवताच एकच जल्लोष पाह्यला मिळाला. यानंतर तो जमावाच्या आवाजाने नेटमध्ये सरावासाठी गेला. सराव सत्रादरम्यान धोनी डाव्या पायाने लंगडताना दिसला. ४१ वर्षीय धोनीला धावा काढण्यात अडचण येत होती. त्यामुळे धोनी आता गंभीर दुखापत झाली आहे, हे समोर आले आहे. कारण धोनीला त्यानंतर फलंदाजी करण्यासाठीही उभे राहता येत नव्हते. पण आता हा सामना काही तासांवर आला असताना त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स समोर आली आहे.धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही, अशी माहिती आता समोर येत आहे. धोनी जर पूर्णपणे फिट नसेल तर त्याला खेळवण्याची जोखीम चेन्नईचा संघ उचलणार नाही. ही दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्यामुळे धोनी पहिल्या सामन्यात कदाचित खेळू शकणार नाही, अशी माहीती आता समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात धोनी खेळणार की याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर धोनी जर पहिला सामना खेळणार नसेल तर संघाचे नेतृत्व कोण करणार, हा चेन्नईच्या पुढे एक प्रश्न असेल. पण चेन्नईने यापूर्वीच या प्रश्नाचे उत्तर शोधलेले आहे, असे म्हटले जात आहे. कारण चेन्नईचा संघ धोनीवर जास्त वर्षे विसंबून राहू शकत नाही. त्यामुळे चेन्नईच्या संघाने नेतृत्व करण्यासाठी एका खेळाडूला संघात स्थान दिले आहे. धोनीची ही अखेरची आयपीएल असेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनी या हंगामात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.