नवी मुंबई हादरली; पनवेल रेल्वे स्थानकात अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 3, 2023

नवी मुंबई हादरली; पनवेल रेल्वे स्थानकात अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

https://ift.tt/KD3qTLY
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकांमध्ये ३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पनवेल शहरामध्ये वारंवार स्रिया लहान मुलींविषयी अत्याचार छेडछाड केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शहरामध्ये सतत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पनवेल रेल्वे स्थानकावरील लहान मुलीचे जीवन देखील सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. पनवेल रेल्वे स्टेशनवर तीन वर्षीय मुलीस आडोशाला नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार होताच तत्काळ शोधाशोध केल्याने व मुलगी बेशुद्ध सापडल्यावर आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घेतल्याने आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या प्रकाराने रेल्वे स्थानकावर झोपणार्या बालिका वा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ३ वर्षीय मुलगी रात्री साडेतीन पासून बेपत्ता असल्याची माहिती तिच्या पालकांनी रेल्वे पोलिसांना दिली. लहान मुलगी गायब झाल्याचे गांभीर्य ओळखत तत्काळ मुलीची शोधाशोध सुरु करण्यात आली. सदर मुलगी बेशुद्ध अवस्थेत १ क्रमांकाच्या फलाटावर एका बाजूला आढळून आली. तिला तत्काळ पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची अवस्था पाहता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, सीसीटीव्ही व तांत्रिक तपासही वेगाने सुरु करण्यात आला होता. या वेगवान तपासणे जुईनगर रेल्वे स्टेशनवर संशयित आढळून येताच त्याला ताब्यात घेत पोलिसानी चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात आरोपीला अटक करण्यात आले असून मुकेशकुमार बाबू खा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार सदर मुलगी लघुशंकेसाठी उठली होती. त्याच वेळेस तिला गोड बोलून जवळ बोलावले होते. आरोपी हा रेल्वे स्थानक परिसरातच भंगार वस्तू बाटल्या आदी गोळा करून ते विकून उदरनिर्वाह करतो. पोलिसांनी तात्काळ केलेल्या हालचाली मुळे गुन्हा दाखल झाल्यावर केवळ पाच तासात आरोपी गजाआड झाला. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी दिली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावरील, स्थानकांमध्ये राहणाऱ्या झोपणाऱ्या स्रिया लहान मुलींच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानक रस्त्यावर राहणाऱ्या मुली आणि स्त्रीयांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण कधी होणार ? किंवा यांच्या सुरक्षेचे काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित राहत आहे.