मेडिकलमधून चालायचे तस्करीचे रॅकेट; कुख्यात वाळूमाफियाची दवाखान्यातून थेट कारागृहात रवानगी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 3, 2023

मेडिकलमधून चालायचे तस्करीचे रॅकेट; कुख्यात वाळूमाफियाची दवाखान्यातून थेट कारागृहात रवानगी

https://ift.tt/RirwALC
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कुख्यात वाळूतस्कर अमोल ऊर्फ गुड्डू खोरगडे हा शस्त्रक्रियेसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तेथूनच रॅकेट संचालित करीत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेडिकलमधील डॉक्टरांच्या संगनमतानेच तो मेडिकलमध्ये दाखल झाल्याचीही चर्चा आहे. याबाबत कळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी डॉक्टरांना तंबी दिली. आयुक्तांच्या तंबीनंतर मेडिकलमधील डॉक्टरांनी तडकाफडकी गुड्डूला सुटी दिली. सुटी मिळताच पोलिसांनी त्याची कोल्हापूर कारागृहात रवानगी केली.-खोरगडे कुख्यात आहे. त्याने टोळीच्या मदतीने मध्यप्रदेशातील बनावट ईपासद्वारे नागपुरातील घाटांवर अवैधपणे रेतीचा उपसा केला. यातून त्याने शासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली.-हा प्रकार उघडकीस येताच या प्रकरणाच्या तपासासाठी अमितेशकुमार यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपास पथकाने गुड्डू व त्याच्या साथीदारांना अटक केली.-८ नोव्हेंबर २०२२मध्ये आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली. त्याला कोल्हापूर कारागृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.-समितीसमोर स्थानबद्धतेची सुनावणी होणार असल्याने त्याची तात्पुरती नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. समितीची सुनावणी पूर्ण झाली.-कोल्हापूरला जाता येऊ नये म्हणून गुड्डूने मूळव्याध झाल्याचे कारागृहातील अधिकाऱ्यांना सांगितले. शस्त्रक्रियेसाठी १६ फेब्रुवारीला तो मेडिकलमध्ये दाखल झाला.-शस्त्रक्रियेनंतर त्याला तीन दिवसांत सुटी मिळायला हवी होती. परंतु, त्याने येथील डॉक्टरांनी हाताशी धरले. त्यानंतर तो मेडिकलमधूनच टोळी संचालित करायला लागला.-याचदरम्यान विविध कारणे सांगून डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे टाळले. याबाबत कळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त एम. सुदर्शन यांना चौकशीचे आदेश दिले.-सुदर्शन यांनी संबंधित पाच डॉक्टरांनी गुड्डूचा संपूर्ण वैद्यकीय अहवाल पोलिस आयुक्तांपुढे सादर करण्यासाठी मेडिकलच्या डॉक्टरला पत्र पाठविले. हे पत्र मेडिकलमध्ये पोहोचताच संबंधित डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली.-गुड्डूला २८ फेब्रुवारी रोजी तडकाफडकी सुटी देण्यात आली. याप्रकरणात एका नेत्याने गुड्डूची मेडिकलमध्ये ‘सेटिंग’ करून दिल्याची चर्चा आहे.