श्रींच्या दर्शनासाठी शेगावात, रांगेत उभे; पण नियतीच्या मनात काही औरच, देवापुढे हात जोडण्यापूर्वीच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 22, 2023

श्रींच्या दर्शनासाठी शेगावात, रांगेत उभे; पण नियतीच्या मनात काही औरच, देवापुढे हात जोडण्यापूर्वीच...

https://ift.tt/BZIPevX
बुलढाणा: येथे श्रींच्या दर्शनासाठी कुटुंबासह आलेल्या चिखली येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक भक्ताची प्रकृती बिघडल्याने श्रींच्या दर्शनाला आलेला भक्ताचा मृत्यू झाल्याची घटना १९ मार्च रविवार रोजी सकाळी घडली. बुलढाणा जिल्हा योगा असोसिएशनचे सचिव तथा चिखली येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक तेजराव डहाके असं या वृद्धाचं नाव आहे. तेजराव डहाके हे त्यांच्या पत्नी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेला त्यांचा मुलगा ऋषिकेश डाके यांच्यासोबत खाजगी वाहनाने १९ मार्च रोजी सकाळी श्रींच्या दर्शनासाठी शेगावला आले होते. सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान मंदिरातील दर्शन रांगेत लागलेले असताना तेजराव ढाके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्यांच्या अवस्थेत त्यांचा डॉक्टर मुलगा आणि पत्नी यांनी मंदिरातील सेवाधारी यांच्या मदतीने दर्शन बारीमधून बाहेर आणले. तसेच मुलाने त्यांची तपासणी केली. दरम्यान, श्री संस्थानमधून रुग्णवाहिका मागवण्यात आली, लगेच श्री संस्थांची रुग्णवाहिका तिथे पोहोचली. त्यांना तेथून रुग्णालयात रवाना करण्यात आले. दरम्यान, रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. तेजराव डहाके हे योगा असोसिएशनचे बुलढाणा जिल्हा सचिव होते. परिवारासह श्रींचे दर्शन आटोपून खामगाव येथील महिला महाविद्यालयात आयोजित योगा कल्चरल वेल्फेअरला ते उपस्थित राहणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.तुळजापूरला जाताना काळाचा घाला, तिघांनी जीव गमावलाआई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांनी जीव गमावला तर पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (२१ मार्च) सकाळी घडला आहे. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सकाळी सातच्या सुमारास भाविकांची बोलेरो गाडी सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाली होती. सोलापूर उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कटारे स्विमिंगजवळ अतिशय वेगात असलेल्या वाहनाचे टायर फुटले. त्यामध्ये बोलेरो वाहन तीन ते चार वेळा पलटी झाली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.