अनैतिक संबंधाचा संशय, तिघं घरात घुसले, पतीला मारण्याचा प्रयत्न, पण सासूला चाकू लागला अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 23, 2023

अनैतिक संबंधाचा संशय, तिघं घरात घुसले, पतीला मारण्याचा प्रयत्न, पण सासूला चाकू लागला अन्...

https://ift.tt/OAG3l9k
सातारा: फलटण तालुक्यातील पवार वस्ती मुंजवडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी घरात घुसून तिघांना मारहाण केली. यावेळी या मारहाणीत सीताबाई किसन सस्ते यांच्या पोटात चाकू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात चाकूने भोसकून खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पवार वस्ती मुंजवडी येथे १९ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीच्या घटनेत सीताबाई किसन सस्ते यांना चाकूने भोसकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुणे येथे ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. या घटनेतील अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबाई सस्ते यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले (पवार वस्ती मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात प्रमिला सोमनाथ सस्ते (वय २६, रा. पवार वस्ती मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याची नोंद २२ मार्चला दुपारी दीडच्या सुमारास फलटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पवार वस्ती मुंजवडी येथील घरात फिर्यादी प्रमिला सस्ते, पती सोमनाथ सस्ते व सीताबाई किसन सस्ते या बसले होते. घराशेजारी राहणाऱ्या स्वाती रमेश घुले हिचे आणि सोमनाथ किसन सस्ते यांच्यात अनैतिक संबंध आहेत, या कारणावरून रागाच्या भरात रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले आणि स्वाती रमेश घुले यांनी घरात घुसून पती सोमनाथ यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी घरातील तिघांना मारहाणकेली. दरम्यान, सासू सीताबाई किसन सस्ते यांच्या पोटात चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या आणि मग उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले, स्वाती रमेश घुले यांच्याविरुद्ध फलटण पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे आणि पोलीस निरीक्षक गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपास करण्याच्या सूचना दिल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे करीत आहेत.