बजरंग दलाने एमसी स्टॅनला केली मारहाण? लाइव्ह शो पाडला बंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 18, 2023

बजरंग दलाने एमसी स्टॅनला केली मारहाण? लाइव्ह शो पाडला बंद

https://ift.tt/CFsuipk
मुंबई- 'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. इंदूरमधील त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बजरंग दलाने रॅपरला मारहाण करत धमकावल्याचा आरोप आहे. ही बातमी समोर आल्यानंतर एमसी स्टेनचे चाहते प्रचंड संतापले आहेत. रॅपरच्या समर्थनात, ट्विटरवर पब्लिक स्टँड्स विथ हा ट्रेंड सुरू झाला आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.'बिग बॉस १६' चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. १७ मार्च रोजी इंदूरमध्ये त्याचा शो होता. दरम्यान, बजरंग दलाच्या लोकांनी एकच गोंधळ घातला. खरं तर, आधीपासूनच एमसी स्टॅनच्या गाण्यांमधील शिवीगाळ आणि महिलांला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याच्या विरोधात आहे. याशिवाय एमसी स्टॅन आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे तरुणाई वाया जाते असा आरोपही बजरंग दलाने केला आहे. या सगळ्यात आता एमसी स्टॅनचे चाहते ट्विटरवर त्याला पाठिंबा देत आहेत. बजरंग दलाची माणसं मंचावर कशी पोहोचली, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. कोणत्याही सुरक्षा रक्षकांनी त्यांना का रोखले नाही? भारतात कलाकाराला मान मिळत नाही, असे अनेकजण म्हणत आहेत. या कॉन्सर्टचे काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बजरंग दलाचे सदस्य धमक्या देताना दिसत आहेत. पण एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी बजरंग दलाच्या सदस्यांसमोरच रॅपरला पूर्ण पाठिंबा दिला.इंदूरनंतर १८ मार्चला नागपुरात एमसी स्टॅनचा लाईव्ह शो आहे. त्यानंतर ४० दिवसांनी तो २८ एप्रिलला अहमदाबादमध्ये शो करणार आहे. दुसऱ्या दिवशी २९ तारखेला जयपूर, त्यानंतर ६ मे रोजी कोलकाता आणि ७ मे रोजी दिल्ली येथे त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट होईल.