राज्यात लाचखोरीची 'कोटी कोटी उड्डाणे'! 'या' जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकरणे उघड, जाणून घ्या आकडेवारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 3, 2023

राज्यात लाचखोरीची 'कोटी कोटी उड्डाणे'! 'या' जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकरणे उघड, जाणून घ्या आकडेवारी

https://ift.tt/OxUid9e
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाचखोरीमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. नागपूरमध्ये ‘एमआयडीसी’मधील एका अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली. या वर्षातील ही सर्वाधिक रक्कम आहे, तर दुसरीकडे विहिरीसाठी लाच मागितल्याचा निषेध करण्यासाठी संभाजीनगरमध्ये सरपंचानेच दोन लाख रुपये पंचायत समिती कार्यालयासमोर उडविले. यामुळे लाचखोर चांगलेच चर्चेत आले आहेत.‘सापळे’ही वाढलेलाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लावण्यात आलेले सापळे आणि पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्येही वृद्धी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्यभरात सन २०२२मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत १७४ सापळ्यांमध्ये २२७ लाचखोरांना पकडले होते. यंदा सापळे आणि लाचखोर या दोन्ही संख्येत वाढ झाली आहे. चालू वर्षात २२० सापळ्यांमध्ये ३१३ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. सन २०२१मध्ये पहिल्या तीन महिन्यांत सापळे आणि अटक लाचखोरांची संख्या अनुक्रमे २११ आणि २८४ अशी होती. लाचखोरीच्या या तिमाहीतील सर्वांत मोठी रक्कम म्हणजे एक कोटी आहे. दोन महिलांनी केलेल्या तक्रारींवर आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी एक कोटी रुपयांची लाच नागपुरात मागण्यात आली होती. या लाचेचा २५ लाखांचा पहिला हप्ता घेताना ‘एमआयडीसी’चा अधिकारी आणि खासगी एजंटला अटक करण्यात आली होती.नाशिक विभाग पुण्याच्या पुढेपहिल्या तिमाहीतील आकडेवारी पाहिली, तर नाशिक विभाग लाचखोरीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. बहुतांश वेळा पुणे विभाग लाचखोरीत प्रथम क्रमांकावर असतो. मात्र, या वेळी पुण्याला मागे टाकत नाशिक पुढे गेले आहे. पुण्यामध्ये ४३ सापळ्यांमध्ये ६१ जणांना अटक करण्यात आली, तर नाशिकमध्ये ४५ सापळ्यांमध्ये ७० लाचखोर अडकले आहेत.तिमाहीतील आकडेवारीसन २०२३... सन २०२२... सन २०२१सापळे...अटक सापळे...अटक सापळे...अटकजानेवारी ५९ ८० ४६ ६५ ६२ ८७फेब्रुवारी ७५ १११ ५० ६५ ६६ ८६मार्च ८६ १२२ ७७ ९५ ८३ १११नाशिक पहिले, पुणे दुसरेविभाग... सापळे अटकनाशिक... ४५ ७०पुणे... ४३ ६१छ. संभाजीनगर... ३६ ४९ठाणे... २७... ३९नागपूर... २३... ३६अमरावती... २०... २७नांदेड... १६... १९मुंबई... १०... १२महसूल विभाग अव्वलखाते लाचखोरमहसूल ७८पोलिस ३६पंचायत समिती २७नगर परिषद १९विद्युत १८महापालिका १६अन्न व औषध १२जिल्हा परिषद ११