तरुणाने मध्यरात्री नवीन कपडे घातले अन् फेसबुक लाईव्ह करत जीवन संपवले; घटनेनं शहरात खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 5, 2023

तरुणाने मध्यरात्री नवीन कपडे घातले अन् फेसबुक लाईव्ह करत जीवन संपवले; घटनेनं शहरात खळबळ

https://ift.tt/W57PQgC
नागपूर : फेसबुक लाइव्ह करत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळनजक घटना नवीन कामठीतील कुंभारे कॉलनी येथे घडली. कृतांक सिद्धार्थ डोंगरे (वय २७) असं मृत तरुणाचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृतांक हा खासगी काम करायचा. चार वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा पत्नीसोबत वाद व्हायला लागला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली. तेव्हापासून कृतांक हा तणावात राहायला लागला. सोमवारी कृतांकचे नातेवाईक कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर कृतांक हा घरी एकटाच होता. मध्यरात्री कृतांकने नवीन कपडे घातले आणि १.३० वाजताच्या सुमारास त्याने मोबाइलद्वारे फेसबुक लाइव्ह केले. सुरूवातीला त्याने पंख्याला कपडा बांधला. कपडा तुटतो का हे बघितले. त्यानंतर त्याने कपाळाला टिळा लावला. मी आत्महत्या करीत आहे ,असे म्हणत त्याने गळफास घेतला. एका नातेवाईकाला तो गळफास लावताना फेसबुकवर लाइव्हवर दिसला. नातेवाईकाने कृतांकच्या शेजाऱ्याला मोबाइलद्वारे माहिती दिली. शेजाऱ्याने अन्य नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला. मात्र कृतांक हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर परिसरातील एका नागरिकाने नवीन कामठी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी फास काढून कृतांकला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने कामठीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.